राजेंद्र पाटील राऊत
देगलूर येथे शेतकऱ्यांचा चक्काजाम आंदोलन यशस्वी देगलूर,( संजय कोकेंवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)देगलूर येथे काल दिनांक 6 फेब्रुवारी रोजी नांदेड ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी दोन तास सर्व वाहने थांबवून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन सर्व पक्षाच्या वतीने करण्यात आले असून, शेतकरी विरोधी तीनही काळे कायदे तत्काळ रद्द करा, शेतकऱ्यांना शेतमालाचा हमीभाव कायदा लागू करा, व शेतकरी विकासाची धोरणे राबवा. अन्यथा खुर्च्या खाली करा. या घोषणेने संपूर्ण देगलूर शहर दणाणून गेले होते. मागील 74 दिवसांपासून दिल्ली येथे चालू असलेल्या किसान आंदोलनाला संपूर्ण देशभर चक्काजाम आंदोलनाची हाक दिली गेली. याला प्रतिसाद देत देगलूर येथे शेतकरी व विविध पक्षाच्या वतीने चक्काजाम करण्यात आला होता. या चक्काजाम मध्ये सर्व विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते ॲडव्होकेट मोहसिन अली, शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील,प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख कैलाश येसगे कावळगावकर, संभाजी बिग्रेडचे जिल्हाप्रमुख श्याम पाटील कुशा वाडीकर, काँग्रेसचे दीपक शहाणे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष पाटील, डॉ.उत्तम हिंगोले, बालाजी मैलागिरे, संजय जोशी, बाबुराव मिनकीकर, दिपक रेड्डी, वैभव पाटील, व असंख्य कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.