Home नांदेड देगलूर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण तत्काळ न काढल्यास भाजप यू.मोर्चा ने दिला...

देगलूर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण तत्काळ न काढल्यास भाजप यू.मोर्चा ने दिला आंदोलनाचा इशारा

167

राजेंद्र पाटील राऊत

देगलूर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण तत्काळ न काढल्यास भाजप यू.मोर्चा ने दिला आंदोलनाचा इशारा

नांदेड, दि.३१ – राजेश एन भांगे

देगलूर येथे मगच्या कार्यकाळात शहरातील मुख्य बाजार पेठेतील वाढलेली अतिक्रमण साफ करून तेथे चकाचक प्लेवर ब्लॉक व सी. सी रोड बनवून शहर वासियांना एक मोकळा श्वास देण्याचे काम केले होते.
परंतु हल्ली त्याच मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले असून त्यामुळे इतर वाहन धारक व पादचाऱ्यांना रस्त्याने चालणे कठीण होत असून ही बाब लक्षात घेता हे अतिक्रमण तत्काळ काढून अतिक्रमण धरकांवर कार्यवाही करण्या संदर्भात भाजप युवा मोर्चा तर्फे कार्यकारी अभियंता व नगर परिषदेचे मुख्यधिकारी यांना निवेदन देण्यात आले व तसेच झालेले अतिक्रमण लवकरात लवकर न काढल्यास भाजप युवा मोर्चा तर्फे आंदोलन करण्यात येईल व याची सरस्वी जबाबदारी नगर परिषदेची राहील असा इशाराही यावेळी मुख्यधिकरी यांना निवेदनाद्वारे देण्यात आले.
तरी यावेळी आत्माराम पाटील, चिलवरवार बी.आर,गंगाधर दाउलवार ,दिगंबर कौरवार,सतीश जोशी,मनोज शिंगारे, सुरज मामीडवार, राहुल पेंडकर, भाजयुमो अशोक कांबळे, योगेश रौलवर, सौरभ मधुरवार,अर्जुन वणप्रतिवार ,अमर पब्बावार , सचिन कांबळे,संतोष मरतुळे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleग्रामीण भागात कलम ३७ लागू निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांचे आदेश
Next articleदोन हजार वीसने आम्हांला काय दिले काय कमावले,अन काय गमावले?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.