Home सामाजिक दोन हजार वीसने आम्हांला काय दिले काय कमावले,अन काय गमावले?

दोन हजार वीसने आम्हांला काय दिले काय कमावले,अन काय गमावले?

285
0

राजेंद्र पाटील राऊत

संपादकिय अग्रलेख!
दोन हजार वीसने आम्हांला काय दिले
काय कमावले,अन काय गमावले?
वाचकहो,
सन २०२० या वर्षाने आम्हांला काय दिले? आम्ही काय कमावले,आणि काय गमावले? याचा लेखाजोखा मांडण्याचा आजचा हा वर्षातील शेवटचा दिवस! तस बघितलं तर २०२० हे वर्ष अत्यंत दुःखाचं, संकटाच,संघर्षाच गेल.या वर्षात कोरोनासारख्या महामारी संकटाचा सामना करतांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागल.अत्यंत जीवाभावाची ज्यांनी आम्हांला आमच्या लहानपणी स्वतःच्या अपत्याप्रमाणे जिव्हाळा दाखविला,माया लावली ते “युवा मराठा”परिवाराचे आधारस्तंभ दादाजी रतन शेवाळेही याच वर्षी आम्हांला पोरके करुन गेलेत.त्याशिवाय इतिहासाचे संशोधन करीत असताना सुमारे चौदाशे वर्षापुर्वीचा ताम्रपट देखील शोधण्यात आम्हांला यश आले.शिवाय याच वर्षी कौळाणे (निं.) आणि व-हाणे येथील पत्रकार भवनच्या जागेचा संघर्ष सुरु झाला.युवा मराठा न्युजच्या सेवेत सुमारे पंचावन्न प्रतिनिधीची टिम संपूर्ण महाराष्ट्रभर उभी राहिली.महत्त्वाची बाब म्हणजे युवा मराठा वृतपत्रांच्या कोल्हापूर आवृतीची सुरुवातही याच वर्षी मोहन शिंदे यांनी व्यशस्वीपणे साकार करुन दाखविली.तर युवा मराठाची विभागीय बैठक विभागीय संपादक नारायण भोये यांनी साल्हेर येथे व्यशस्वी करुन दाखविली.
युवा मराठाने कोरोनासारख्या संकटकाळात केलेल्या कर्तबगारीचा सन्मान म्हणून बीड येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद व नागपूरच्या एकता फाऊंडेशनचा कोरोना योध्दा म्हणून गौरव प्राप्त करण्याचे भाग्य आम्हांला मुख्य संपादक या नात्याने प्राप्त झाले.
ज्यांना आम्ही पत्रकारितेत नावारुपास आणले असे काही हरामीही आमच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचे काम या २०२० वर्षात करुन मोकळे झालेत.
सत्याच्या वाटेवर चालताना आम्ही निराश्रीत दिनदुबळ्यांचा सहारा बनण्याचा पुरेपूर प्रयत्न या वर्षात केला.
अनेक संकटे अडचणी येऊनही युवा मराठा च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून धाडसाने वेगवेगळे आँनलाईन न्युजचे फेरबदल करण्याची लिलया कामगिरी व्यवस्थापकीय संपादक श्रीमती आशाताई बच्छाव यांनी पार पाडली.
युवा मराठाच्या या वर्षातील वाटचालीत आम्हांला आमच्या सगळ्यांच प्रतिनिधीची अभूतपूर्व व मोलाची साथ लाभली.त्यानिमित सगळ्यांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद !सन २०२० या वर्षात खुपच दुःख भोगले,अडचणी संकटाना सामोरे गेलोत.तरीही हिंमत मात्र हरलो नाहीत…लढाई अजून चालूच आहे…उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षातही आमचा लढा हा अन्याय अत्याचार दांभिक भामटयांविरुध्द सुरुच राहिल..फक्त सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी! नवीन वर्षाच्या आपणा सगळ्यांना मनपुर्वक शुभेच्छांसह…
राजेंद्र पाटील राऊत मुख्य संपादक युवा मराठा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here