राजेंद्र पाटील राऊत
*मालेगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रात सर्व नागरिकांना मास्क चा वापर अनिवार्य* :-
मनपा आयुक्त त्रंबक कासार
*विनामास्क नागरिकांकडून दंड वसुलीसाठी मनपा, पोलिस व महसूल प्रशासनाचे संयुक्त पथक, शहरातील विविध भागात दररोज होणार कारवाई.*
(सतिश घेवरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगाव : लॉक डाऊन नंतर मिशन बिगीन अंतर्गत नागरिकांसाठी विविध गोष्टी,सोयी, सवलती सुरू व खुल्या करण्यात आलेल्या आहेत, परंतु अजूनही कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. संभाव्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सर्वप्रकारच्या सतर्कता बाळगत आहे. याच धर्तीवर मालेगाव शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर मालेगाव महापालिका , महसूल व पोलिस प्रशासनाकडून दंड वसुलीची संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे असे आयुक्त त्रंबक कासार यांनी विभाग प्रमुखांच्या बैठकीत सांगितले.
कोरना चा संपूर्ण बिमोड करण्यासाठी आज घडीला प्रभावी लस किंवा औषध उपलब्ध नाहीये. म्हणून सद्यस्थितीत प्रतिबंध हाच उपचार या धरतीवर आधारित मास्क व सॅनिटायझरचा चा वापर आणि सामाजिक अंतर पाळणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोरोनाची साखळी पूर्णपणे तोडायची असेल, तर सुरक्षित अंतर पाळणे, मास्कचा
नियमीत वापर व सॅनिटायझरचा
वापर या गोष्टींचा अवलंब करणे
अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांनी
मास्क लावूनच कामानिमित्त बाहेर
फिरावे. मास्क न वापरणाऱ्या
नागरिकांवर आता महानगरपालिका व पोलीस आणि महसूल प्रशासन यांचे संयुक्त पथक संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात विविध भागात प्रत्यक्ष दंडात्मक कारवाई करून दंड वसूल करणार आहे. यांची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि नागरिकांनी नियमित मास्क चा वापर करावा असे आवाहन आयुक्तांमार्फत करण्यात येत आहे.




