राजेंद्र पाटील राऊत
नगाव शिवारातून सहा लाख रुपयांचा गुटखा जप्त;एका आरोपीला अटक
मालेगांव,(युवा मराठा न्युज नेटवर्क)-तालुक्यातील नगांव शिवारातून अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने राज्य सरकारने विक्रीस प्रतिबंधीत केलेला ५ लाख ८८ हजार ९८४ रुपये किंमतीचा पान मसाला गुटखा जप्त केला आहे.तर याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे.
राजेंद्र दगा मलिक वय ४४ रा.मांदळे वस्ती नगांव शिवार ता,मालेगांव याने आपल्या कब्ज्यात राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेल्या सुगंधी पानमसाले तंबाखू यांचा अवैध विक्रीसाठी साठा केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली.अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश राजसिंग दाभाडे वय३८ रा.रुम नं.२१ व २३ , ५ वा मजला,उद्योग भवन,सातपूर नाशिक यांनी नगांव येथे टाकून राजेंद्र मलिक यांच्या कब्ज्यातून विमल पान मसाला व व्हि.एन तंबाखू असा सुमारे ६ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला असून,अविनाश दाभाडे यांच्या फिर्यादीवरुन मालेगांव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करुन राजेंद्र मलिक यास अटक करण्यात आली आहे.पुढील तपास सपोनि.पाटील हे करीत आहेत.