Home कोल्हापूर मास्क नाही भाजीपाला ही नाही डाँ.कांदबरी बलकवडे (महापालिका प्रशासक)

मास्क नाही भाजीपाला ही नाही डाँ.कांदबरी बलकवडे (महापालिका प्रशासक)

148
0

राजेंद्र पाटील राऊत

मास्क नाही भाजीपाला ही नाही
डाँ.कांदबरी बलकवडे (महापालिका प्रशासक)

कोल्हापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यापुढे सर्वच भाजी विक्रेत्यांनी मास्क नाही-भाजीपालाही नाही, अशी भूमिका घेऊन ती कठोरपणे राबवावी, असे आवाहन महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.
आजच्या 82 व्या स्वच्छता मोहिमेत महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी हातात झाडु घेऊन पंचगंगा घाटावरील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. डॉ.बलकवडे यांनी मोहिमेंतर्गत स्वच्छता तर केलीच पण पंचगंगा घाट येथील भाजी व फळविक्रेत्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क व हॅण्डग्लोज वापरणे आणि सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक असून भाजी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना मास्क व सामाजिक अंतराचे पालन केल्याशिवाय भाजीपाला तसेच फळांची विक्री करुन नये, असे आवाहनही केले.
स्वच्छता अभियानातून कोल्हापूर शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनविण्यासाठी नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहनही डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले. यावेळी आरोग्यधिकारी डॉ. अशोक पोळ, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पोवार, स्वरा फौंडेशनचे प्रमोद माजगांवकर आदिजण सहभागी झाले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील फळ आणि भाजीविक्रेत्यांनी मास्क व हॅण्डग्लोज वापरणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, कोठेही न थुंकणे, सॅनिटायझर वापरणे आणि गर्दीत न करु देणे या गोष्टीं महत्वाच्या असल्याचे सांगून प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, ‘कोरोना कमी झाल्याचे दिसत असले तरी त्याचा धोका टळलेला नसल्याने नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे’.
पंचगंगा घाट येथील भाजी विक्रेत्यांना नो मास्क नो एन्ट्री उपक्रमासंदर्भात माहिती दिली. तसेच स्वच्छ सर्व्हेक्षण २०२१ च्या अनुषंगाने स्व्‍च्छता ॲप डाऊनलोड व त्याचा वापर याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleअखेर शाळेची घंटा लांबणीवर. शाळा उघडण्याचा निर्णय 30 नोव्हेंबर पर्यंत स्थगित. जिल्हा प्रशासनाचे आदेश..
Next articleअत्यंत जिद्दीने व हलाखीच्या परिस्थितीतून मिळवले बी.ए. एल.एल.बी .परीक्षेत यश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here