Home पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यात आज अखेर ४६ हजार ६३७ कोविड रूग्णांना डिस्चार्ज

कोल्हापूर जिल्ह्यात आज अखेर ४६ हजार ६३७ कोविड रूग्णांना डिस्चार्ज

125
0

राजेंद्र पाटील राऊत

कोल्हापूर जिल्ह्यात आज अखेर ४६ हजार ६३७ कोविड रूग्णांना डिस्चार्ज

कोल्हापूर, : जिल्ह्यात आज अखेर आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे ८०० प्राप्त अहवालापैकी ७६३ निगेटिव्ह तर पॉझीटिव्ह १४ आहेत (६ अहवाल पुन्हा तपासणी, १७ अहवाल नाकारण्यात आले). ॲन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे १२९ प्राप्त अहवालापैकी १२८ निगेटिव्ह तर १ अहवाल पॉझिटिव्ह आहेत. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये १५२ प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह १३२ तर २० पॉझीटिव्ह, असे एकूण ३५ अहवाल पॉझीटिव्ह आहेत.
जिल्ह्यात आजअखेर एकूण ४८ हजार ८९५ पॉझीटिव्हपैकी ४६ हजार ६३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण ५८७ पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
काल संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त ३५ पॉझीटिव्ह अहवालापैकी भुदरगड-५, चंदगड ३, कागल-१, करवीर-१, पन्हाळा-१, नगरपरिषद क्षेत्र-४, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-१६, व इतर शहरे व राज्य ४ असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा-८५६, भुदरगड- १२२७, चंदगड- १२०९, गडहिंग्लज- १४५७, गगनबावडा- १४४, हातकणंगले- ५२७६, कागल-१६६१, करवीर-५६०४, पन्हाळा- १८४८, राधानगरी-१२३३, शाहूवाडी-१३४३, शिरोळ- २४९१, नगरपरिषद क्षेत्र-७४०४, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- १४ हजार ८५५ असे एकूण ४६ हजार ६०८ आणि इतर जिल्हा व राज्यातील – २ हजार २८७ असे मिळून एकूण ४८ हजार ८९५ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील ४८ हजार ८९५ पॉझीटिव्ह रूग्णांपैकी ४६ हजार ६३७ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला असून १ हजार ६७१ जणांचा मृत्यू झाला आहे. आज अखेर जिल्ह्यात ५८७ पॉझीटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
युवा मराठा न्यूज नेटवर्क.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here