आमदार दिलीप बोरसेंची नागरिकांनी घेतली भेट सटाणा,( जगदिश बधान तालुका ग्रामीण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-काल दि.१३/९/२०२० रोजी बागलाणचे आमदार मा.दिलीपजी बोरसे साो.यांची भेट घेतली असता विविध विषयांवर चर्चा करण्यात आली त्यात महत्वाचे विषय म्हणजे आदिवासी दफनभुमी,खावटी अनुदान योजना,रेशनकार्ड,जातीचे दाखले,तसेच औंदाणे येथील आदिवासी वस्तीतील कॉंक्रिटीकरण,समाजमंदिर बाबत निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे अन्य विषयांवरदेखील सखोल चर्चा करण्यात आली.त्याप्रसंगी औंदाणे येथील जयेशभाऊ सोनवणे,प्रवीण पवार,सोमपुर तसेच औंदाणे,सोमपुर,करंजखेड,तरसाळी येथील तरुण उपस्थित होते