Yuva maratha news
आश्रयआशा फाउंडेशनचे राज्यस्तरीय शिवछत्रपती
पुरस्कार जाहीर
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थांनी लवकरात लवकर संपर्क साधावा
कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र राऊत पाटील यांचे आवाहन
निफाड, रामभाऊ आवारे प्रतिनिधी:
आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे (मालेगाव) या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित पाचव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार सन्मान २०२६ विविध क्षेत्रासाठी जाहिर करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांनी दिली आहे.
आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे या संस्थेच्या माध्यमातून व युवा मराठा महासंघ महाराष्ट्रच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या पुढील मान्यवरांना पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे —–
रामभाऊ आवारे (अध्यात्मिक व पत्रकारिता) निफाड जि.नाशिक, भानुदास शेजूळ (सामाजिक व पत्रकारिता) सिंदखेडराजा बुलढाणा, शत्रुघ्न सुर्यभान निकम (भटक्या विमुक्तांची चळवळ) माळशिरस सोलापूर, डॉ.रावसाहेब घोरपडे (वनीकरण) छत्रपती संभाजीनगर, डॉ.चंदनमल बाफना (मुक प्राणीसेवा) संगमनेर अहिल्यानगर, अभिमन्यू के.गायकवाड (उत्कृष्ट पोलिस सेवा) नाशिक, एकनाथ भोसले (आदर्श सरपंच) डाबली मालेगाव, अशोक शेवाळे (आदर्श ग्रामपंचायत अधिकारी) नागझरी मालेगाव, धर्मराज अहिरे (सामाजिक व राजकीय) राजापूरपांडे ता.बागलाण, तुषार अहिरे (आदर्श ग्रामरोजगार सेवक) डाबली मालेगाव, दत्तात्रय पांडुरंग डोक (सामाजिक व कोरोना योध्दा) अहिल्यानगर,सौ.सुमनताई अभिमन्यू गायकवाड (आदर्श महिला सरपंच) रोझे मालेगाव आदिंना हा मानाचा पुरस्कार घोषित करण्यात आला असून, महाराष्ट्रांतील १५१ व्यक्तींना सदर पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याने इच्छुक असलेल्या महिला व पुरूषांनी पुढील नंबरवर संपर्क साधावा. 9850447685/9923362030 असे आवाहन करण्यात आले आहे.तर सदरचा राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार सन्मान सोहळा २०२६ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव श्रीमती आशाताई बच्छाव, उपाध्यक्ष राजेंद्र तुकाराम पवार, खजिनदार प्रशांत बच्छाव,दिपक भावसार, प्रमोद पवार व युवा मराठा महासंघाचे राज्य प्रसिद्धी प्रमुख रामभाऊ आवारे व सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.






