Home नाशिक नाशिकमध्ये मतदान यंत्रात बिघाड तर मतदारांची दुसऱ्याच प्रभागात नावे

नाशिकमध्ये मतदान यंत्रात बिघाड तर मतदारांची दुसऱ्याच प्रभागात नावे

200

आशाताई बच्छाव

1002502970.jpg

नाशिक प्रतिनिधी मुकुंदा चित्ते :-
महानगरपालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजेपासून मतदान सुरू झाले आहे. मात्र, बहुतांशी मतदान केंद्रांवर मतदारांची नावे सापडत नसल्यामुळे किंवा अगोदरच्या मतदान केंद्रा ऐवजी भलत्याच ठिकाणी दूरवरील केंद्रावर मतदाराची नाव असल्यामुळे गोंधळ असल्याचे चित्र आहेत.काही मतदारांचे प्रभाग देखील बदलण्यात आले असून काहींच्या घराजवळचे मतदान केंद्र सोडून दुसऱ्या प्रभागाच्या हद्दीजवळ मतदान केंद्र देण्यात आले आहेत कुटुंबातील बहुतांशी सदस्यांची फाटाफूट करण्यात आल्याने गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले अनेक मतदार त्यामुळे मतदान न करताच परत जात आहेत.

दरम्यान शहरातील आनंदवली येथील मतदान केंद्रावर ईव्हीएमचा बिघाड झाला तसेच सिडकोतील प्रभाग 25 मध्ये एका मतदान केंद्रावर चार पैकी एकच ईव्हीएम सुरू असल्यामुळे सुमारे तासभर मतदान ठप्प होते अखेरीस नवीन ईव्हीएम आणल्यानंतर मतदान सुरू झाले

Previous articleशिवणी-तालसवाडा रस्त्यावर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; गळा आवळून खून केल्याचा दाट संशय?
Next articleआश्रयआशा फाउंडेशनचे राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.