Home बुलढाणा शिवणी-तालसवाडा रस्त्यावर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; गळा आवळून खून केल्याचा दाट संशय?

शिवणी-तालसवाडा रस्त्यावर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; गळा आवळून खून केल्याचा दाट संशय?

164

आशाताई बच्छाव

1002492336.jpg

शिवणी-तालसवाडा रस्त्यावर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; गळा आवळून खून केल्याचा दाट संशय?
युवा मराठा न्युज बुलढाणा जिला ब्युरो चिफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-मलकापूर शिवणी ते तालसवाडा या ग्रामीण रस्त्याच्या कडेला ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमोल भाऊराव भवरे असे मृत तरुणाचे नाव असून, मृतदेहावरील गळ्याच्या ठळक खुणांमुळे हा अपघाती मृत्यू नसून थेट गळा आवळून खून करण्यात आल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.८ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास रस्त्याच्या कडेला संशयास्पद अवस्थेत मृतदेह पडलेला असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच मलकापूर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गळ्यावर आढळलेल्या खुणा, मृतदेहाची स्थिती आणि घटनास्थळावरील परिस्थिती पाहता हा प्रकार पूर्वनियोजित खुनाचा असल्याचा संशय
अधिक बळावला आहे. तरुणाची हत्या करून मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि मृत तरुणाच्या मागील हालचालींच्या आधारे सखोल तपास सुरू आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच या रहस्यमय मृत्यूचा उलगडा होईल का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Previous articleराजमाता माँ जिजाऊ यांना जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांचे अभिवादन
Next articleनाशिकमध्ये मतदान यंत्रात बिघाड तर मतदारांची दुसऱ्याच प्रभागात नावे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.