आशाताई बच्छाव
भारतीय बौद्ध महासभा नागपूर जिल्हा पश्चिम शाखा कार्यकारणी निवड/ पुनर्गठन
अध्यक्ष पदी सुधाकर मेश्राम तर सरचिटणीस पदी सतीश सोमकुवर यांची नियुक्ती
संजीव भांबोरे
नागपूर —दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा संस्थापक बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय मीराताई यशवंत आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ.भीमराव यशवंत आंबेडकर व ट्रस्टी चेअरमन डॉ. हरिष रावलीया यांच्या निर्देशाच्या अनुशंगाने नागपूर जिल्हा पश्चिम शाखेची कार्यकारणी निवड/ पुनर्गठन बैठक त्रिरत्न बुध्द विहार हुडको कॉलनी कळमेश्वर येथे भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी तथा स्टाफ ऑफिसर केंद्रीय कार्यालय प्रमुख मुंबई ऍड. एस. के.भंडारे यांच्या मार्गदर्शनात आणि अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शाखा यु. जी. बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच केंद्रीय संघटक, इंजि. पद्माकर गणवीर, राज्य संघटक भीमराव फुसे, महिला शाखा पश्चिम अध्यक्षा इंदूताई रामटेके, महिला शाखा पूर्व पपिता खोब्रागडे, यांच्या प्रमूख उपस्थिती भारतीय बौद्ध महासभा नागपूर जिल्हा पश्चिम शाखा कार्यकारणीची निवड/पुनर्गठन बैठक आयोजित करण्यात आली.*
*सर्व प्रथम बैठकीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी ऍड. एस. के.भंडारे आणि महाराष्ट्र राज्य शाखा अध्यक्ष यु. जी. बोराडे यांनी बौद्ध बांधवांना मिशन २५ बाबत मार्गदर्शन केले. व नवीन कार्यकारणी निवड करिता इच्छुकांचे आवेदन भरून घेऊन निवड समितीच्या द्वारे मुलाखती घेवून सर्वानुमते भारतीय बौद्ध महासभा नागपूर जिल्हा पश्चिम शाखच्या अध्यक्ष पदी सुधाकर सीताराम मेश्राम तर सरचिटणीस पदी प्रबोधनकार सतीश राजकुमार सोमकुवर यांची नियुक्ती करण्यात आली. सतीश सोमकुवर हे संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषेत समाज प्रबोधनाचे कार्य करीत असून त्यांचा दांडगा समाजात संपर्क आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध धम्म चळवळीतून समाजात जन जागृती निर्माण करून आदर्श बौद्ध समाज निर्मितीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्नपूर्ती साठी आपला हातभार लावून समाज सेवा घडावी हाच उदात्त हेतू आहे. समाज कार्यात प्रबोधनकार सतीश सोमकुवर हे मोलाची भूमिका बजावत आहेत त्यांची नियुक्ती भारतीय बौद्ध महासभेला घराघरात पोहचविण्यात मदतगार ठरणार आहे. तसेच भारतीय बौद्ध महासभा नागपूर जिल्हा पश्चिम शाखा कोषाध्यक्ष म्हणून विलास उंदिरवाडे, उपाध्यक्ष (संस्कार) राहुल लक्ष्मण वानखेडे, उपाध्यक्ष (प्रचार व पर्यटन) आनंदराव हरिभाऊ सायरे, हिशोब तपासनी भीमराव चिंधुजी बोरकर, सचिव (प्रचार व पर्यटन) युवराज पिलाजी मेश्राम, सचिव (संरक्षण) यशवंत महादेव तामगाडगे, संघटक अशोक किसनाजी झामरे, संघटक परसराम मनिराम तभाने यांची सर्वानुमते निवड समिती द्वारे नियुक्ती करण्यात आली.*
*बैठकीला नागपूर जिल्हा पश्चिम शाखा तालुक्यातील- नागपूर ग्रामीण व बुट्टीबोरी, हिंगणा, कळमेश्वर, सावनेर, कोटोल, नरखेड येथील भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी संघटक, केंद्रीय शिक्षक/शिक्षिका बौद्धचार्य प्रामुख्याने उपस्थित होते. नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकारी व संघटकाचे निवड समितीच्या वतीने स्वागत तथा अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.






