Home भंडारा जागेच्या वादातून उपसरपंच व लहान भावाला तिघांची मारहाण

जागेच्या वादातून उपसरपंच व लहान भावाला तिघांची मारहाण

21

आशाताई बच्छाव

1002387382.jpg

जागेच्या वादातून उपसरपंच व लहान भावाला तिघांची मारहाण

उपसरपंच रूग्णालयात ; पोलीसात गुन्हा दाखल ; कठोर कारवाईची मागणी

संजीव भांबोरे
भंडारा–साकोली तालुक्यातील गटग्रामपंचायत गुढरी चिचगाव येथील उपसरपंच विकास रहांगडाले यांसह त्यांचा लहान भावाला जागेच्या वादातून तिघा आरोपींनी जबर मारहाण केली. यात उपसरपंच जखमी होत रूग्णालयात दाखल झाले. तर याप्रकरणी लाखनी पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ( सोम. २२ डिसें.) ला स. ८ दरम्यान चिचगाव तह. साकोली येथे घडली.
सविस्तर वृत्त की, मौजा चिचगांव ता. साकोली येथील उपसरपंच विकास रहांगडाले यांची वडिलोपार्जित शेतजमीनीवर त्यांचा हक्क आहे. दि. २२ डिसें. स. ७:३० दरम्यान उपसरपंच विकास रहांगडाले हे शेतशिवारात आपले ट्रॅक्टर टिनाचे शेडमधे लाऊन घरी जात असता त्यांना त्यांच्या आईने सांगितले की, कुणीतरी शेतातील झाडे कापत आहेत. यावेळी ते ऐकून त्यांच्या जवळ येत आरोपी मनिष रहांगडाले २५ याने उपसरपंच यांची कॉलर पकडली. व राजन रहांगडाले आणि नरेश रहांगडाले या तिघांनी मिळून उपसरपंच विकास रहांगडाले यांना लाथाबुक्क्यांनी पाठीवर, मानेवर, छातीवर मारहाण केली. व फिर्यादी व त्याच्या परीवाराला जीवे मारण्याची धमकी दिली. यात आरोपींनी उपस्थित त्यांचा लहान भाऊ दिलीप रहांगडाले यांना सुद्धा छातीवर जबर मारहाण केली. यात उपसरपंच विकास रहांगडाले व दिलीप रहांगडाले यांना लाखनी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करून बुधवार २४ डिसेंबरला पो. स्टे. सीमा लाखनी असल्याने पोलीस ठाणे लाखनी येथे तिन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत ३५१ (२), ३५२, ३ (५), ११८ (१) कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाखनी पोलीस करीत आहेत.
सदर प्रकरणात उपसरपंच विकास रहांगडाले यांनी सांगितले की, माझीच वडीलोपार्जित जमिन, व माझाच त्या शेतजमीनीवर शेती हक्क आहे आणि मलाच संगनमत करून बेदम मारहाण करण्यात आली. याची चौकशी होऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा मला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा सुद्धा दिला आहे.