Home मुंबई राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचे बिगूल वाजले.

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचे बिगूल वाजले.

66

आशाताई बच्छाव

1002334393.jpg

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचे बिगूल वाजले.

मुंबई: (प्रतिनिधी विजय पवार )
राज्य निवडणूक आयोगाची आज अतिशय महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या महत्त्वाच्या टप्प्याच्या निवडणुकांची चर्चा आहे. याआधी राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली.
सुप्रीम कोर्टाने याआधीच राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारी २०२६ च्या आधी निवडणुका घेण्याचा आदेश दिला आहे.
त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीची घोषणा झाली आहे. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर शहरांसह एकूण २९ महत्त्वाच्या शहरांमधील महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या निवडणुका रखडल्या आहेत. पण आता या निवडणुका होणार आहेत.
२९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी नामनिर्देश पत्र स्वीकारण्याचा कालावधी हा २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ असणार आहे. या नामनिर्देशन पत्राची छाननी ३१ डिसेंबर २०२५ ला होणार आहे. उमेदवारी माघारीची मुदत ही २ जानेवारी २०२६ अशी असणार आहे. तर निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी ३ जानेवारी २०२६ ला होईल. या महापालिकांसाठी मतदान १५ जानेवारी होईल. तर १६ जानेवारी २०२६ ला मतमोजणी होईल”, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

विभागवार महापालिकांची नावे
मुंबई MMRDA विभाग :
मुंबई
नवी मुंबई
ठाणे
कल्याण-डोंबिवली
वसई-विरार
भिवंडी
मीरा-भाईंदर
उल्हासनगर
पनवेल

पश्चिम महाराष्ट्र विभाग:
पुणे
पिंपरी-चिंचवड
कोल्हापूर
सांगली
सोलापूर
इचलकरंजी

उत्तर महाराष्ट्र विभाग :
नाशिक
अहिल्यानगर
धुळे
जळगाव
मालेगाव

मराठवाडा विभाग :
छत्रपती संभाजीनगर
लातूर
नांदेड-वाघाडा
परभणी
जालना
विदर्भ विभाग :
नागपूर
अकोला
अमरावती
चंद्रपूर

Previous articleYuva-Maratha-14-Dec-to-20-Dec-2025
Next articleचाळीसगाव फाट्यावर लोकशाही धडक मोर्चाच्या रास्तारोको आंदोलनास प्रचंड प्रतिसाद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.