Home उतर महाराष्ट्र अकारी पडीत जमीन धारकांच्या प्रश्नासंदर्भात लवकरच निर्णय

अकारी पडीत जमीन धारकांच्या प्रश्नासंदर्भात लवकरच निर्णय

51

आशाताई बच्छाव

1002313689.jpg

अकारी पडीत जमीन धारकांच्या प्रश्नासंदर्भात लवकरच निर्णय

मंत्री बावनकुळे आणि ना. विखेंच्या उपस्थितीत बैठक संपन्न

श्रीरामपूर दि.११ दिपक कदम 
अकारी पडीत जमीन धारकांच्या प्रश्नासंदर्भात न्याय भूमिका घेण्याची भूमिका महायुती सरकार असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यापुर्वी केलेल्या पाठपुराव्यावर लवकर शिक्कमोर्तब करण्याची भूमिका महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने अकारी पडीत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मंत्री विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी महसुलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकारि पडित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाचे सर्व प्रश्न समाजावून घेत सकारात्मक चर्चा केली.

अकारि पडित प्रश्नाच्या संदर्भात यापूर्वीच मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने काही निर्णय झाले आहेत.अन्य काही निर्णय होण्याच्या दृष्टीने महायुती सरकार निश्चित निर्णय करेल आशी ग्वाही देवून, गोरगरिब अकारि पडित शेतकऱ्यांचा हा प्रश्न सोडविणे ही आपली ठाम भुमिका आहे‌ मंत्रिमंडळ बैठकीत यापुर्वी निर्णय घेतलेला आहे. अधिवेशन संपल्याऩतर मुंबईत राजभवनात राज्यपाल महोदयांची भेट घेवून सर्व निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करण्याची ग्वाही मंत्री बावनकुळे यांनी शेवटी सांगितले‌.

या बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर अॅड अजित काळे यांच्यासह ९ गावातील २५ शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते , चळवळीचे याचिकाकर्ते गिरीधर आसने भाजपाचे दिपक पटारे, गावातील सचिन वेताळ , गोविंद वाघ, ,सुनिल आसने, संतोष मुठे चंद्रकांत खरे, बाळासाहेब वेताळ, गोरखनाथ वेताळ, बापुसाहेब गोरे,बबनराव नाईक,प्रशांत शिंदे, आदिनाथ दिघे,सोमनाथ रूपटक्के,दादासाहेब रूपटक्के, राजेंद्र गोसावी,अक्षय मुठे,सुभाष गाडेकर,अमोल गुळवे,गंगाधर वेताळ,दत्तात्रय भालेरांव आदी उपस्थित होते. प्रारंभी शेतकरी संघटनेचे शरद आसने यांनी प्रास्ताविक केले. तर भाऊसाहेब काळे यांनी आभार मानले.

Previous articleउंडणगाव येथे एच आय व्ही गुप्तरोग तपासणी कॅम्प शिबिर संपन्न
Next articleतरुण पिढीला मार्गदर्शनाची गरज -प्रकाश सोनवणे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.