आशाताई बच्छाव
उंडणगाव येथे एच आय व्ही गुप्तरोग तपासणी कॅम्प शिबिर संपन्न
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
दिनांक. 11/12/2025 रोजी उंडणगाव येथे मराठवाडा ग्रामीण विकास संस्था लिंक वर्कर प्रकल्पा अंतर्गत व आयसीटीसी ग्रामीण वाले सोयगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एच. आय. व्ही.व एस.टी.आय.गुप्तरोग तपासणी कॅम्प घेण्यात आला व लोकांची आरएमसी तपासणी सुद्धा करण्यात अली या कॅप मध्ये एकूण ५६ लोकांची एच.आय. व्ही.तपासणी करण्यात अली यात कौन्सिलर सुनील वानखेडे यांनी उपस्थित लोकांना एच. आय.व्ही. / एड्स विषयी सविस्तर माहिती दिली तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ महेंद्र पाटील व सोनाली चौधरी यांनी उपस्थित लोकांची एच. आय. व्ही. तपासणी केली व डॉक्टर शुभम पाटील माने सर वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र उंडणगाव यांनी उपस्थित लोकांची आरएमसी तपासणी केली यावेळी उपस्थित अरुण चव्हाण देशमुख लिंक वर्कर यांनी उपस्थित लोकांना एच.आय.व्ही. होण्याचे मुख्य चार कारणे सांगितले आणि इतर आरोग्य विषयी सविस्तर माहिती दिली यावेळी उपस्थित डॉ. दिनाजी खंदारे बि. एस. कुंटे आर एम.डोईफोडे आरोग्य सहाय्यक आर.व्ही क्षीरसागर एम.पी.डब्ल्यू एम.डी.धनई अविनाश उर्फ प्रवीण दसरे जगदीश शिरसाठ श्रीमती के जी सनानंसे सिस्टर प्रणिता जयस्वाल सिस्टर आशा वर्कर कल्पना संपाळ जबुन्निसा शगीर मुमताज शहा,सुमन खराटे, येडूबाई वैद्य,इंदुबाई वैद्य, जयश्री मुळे, जबुनन्नीसा पठाण, विमलबाई निकम इत्यादी लोकांची कॅप मध्ये उपस्थिती होती व प्राथमिक आरोग्य केंद्र उंडणगाव सर्व स्टाफ उपस्थित होता.






