आशाताई बच्छाव
उगाव येथील विद्यालयात आनंद मेळावा उत्साहात संपन्न
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक तालुका प्रतिनिधी रामभाऊ आवारे
महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी हायस्कूल व दिनकरराव पानगव्हाणे कनिष्ठ महाविद्यालय उगाव विद्यालयात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन विनता शिक्षण संस्थेचे संचालक श्री मधुकर मापारी यांचे हस्ते करण्यात आले आज खऱ्या अर्थाने खवय्यांसाठी मेजवानी होती विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते विविध प्रकारचे खेळ,मनोरंजन, व्यवसाय ज्ञान, नेतृत्व गुण,नफा – तोटा हा दृष्टिकोन रुजविण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले उपस्थितांपैकी विनता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष साहेबराव पानगव्हाणे, दत्तु काका सुडके व शकील भाई शेख यांनी आपल्या मनोगतातून विद्यालयातील विद्यार्थ्यांना कला गुणांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते ह्या विद्यालयाचे विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर सर्वगुण संपन्न प्रतिभाशाली ,कलावंत व उच्च पदापर्यंत पोहचतात. या कार्यक्रमाच्या प्रसंगी विनता शिक्षण संस्थेचे श्री विजयराव ढोमसे पाटील,श्री नंदू मामा राठी,श्री विष्णुपंत पानगव्हाणे,श्री संदीप पानगव्हाणे,श्री सदाशिव आहेर,श्री मोतीराम कोल्हे,श्री संजय नेहरे,श्री रावसाहेब गवळी,श्री बाळासाहेब पानगव्हाणे,श्री प्रभाकर खापरे,श्री अशोक खापरे,श्री रज्जाक शेख,श्री प्रभाकर मापारी,श्री बाळासाहेब चव्हाण,श्री ज्ञानेश्वर पानगव्हाणे,श्री मधुकर गवळी,श्री दीपक निरभवणे,श्री नौशाद भाई सैय्यद,श्री अब्दुल भाई शेख,श्री मधुकर निरभवने,श्री हिरामण जेऊघाले, श्री प्रदीप जेऊघाले,श्री सतिश कोल्हे,श्री नंदकिशोर पानगव्हाणे,श्री सुनील कोल्हे,श्री निंबा बोरसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते विद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्तविक विद्यालयाचे प्राचार्य श्री कैलास गवळी यांनी केले तर सूत्रसंचालन श्री भालचंद्र सूर्यवंशी व आभार श्री बापू आव्हाड सर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील पर्यवेक्षक श्री नंदाराम ढिकले सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.






