आशाताई बच्छाव
नागपूर | अॅग्रो व्हिजनमध्ये शेळीपालनावर अभयसिंह मारोडे यांचे मार्गदर्शन; तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
✍🏻 स्वप्निल देशमुख
मध्य भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अॅग्रो व्हिजन – नागपूर येथे रविवारी झालेल्या शेळीपालनविषयक सत्राला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. “Goat Farming – Export Opportunities” या विषयावर अभयसिंह मारोडे यांचे हॉल क्रमांक 2 मध्ये दुपारी 12 ते 1 या वेळेत व्याख्यान झाले.
सुरुवातीपासून शेवटपर्यंत हॉलमध्ये प्रचंड गर्दी राहिली. शेळीपालनातील आधुनिक तंत्रज्ञान, व्यवस्थापन, निर्यात क्षमता आणि बाजारपेठेतील वाढत्या मागणीविषयी मारोडे यांनी सरळ, सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. उपस्थितांनी सातत्याने विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी संयतपणे उत्तरे देत व्यवसायातील योग्य दिशा स्पष्ट केली.
व्याख्यानानंतर अनेक तरुण–तरुणींनी त्यांच्या भोवती गर्दी करत व्यक्तिगत मार्गदर्शन घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. “हीच पिढी उद्या भारतीय शेतीला आणि शेळीपालन व्यवसायाला नवी उभारी देईल,” अशी भावना मारोडे यांनी यावेळी व्यक्त केली.
या सत्रात राजस्थानहून विशेष आलेले आदरणीय पटेल सर हे दुसरे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
अॅग्रो व्हिजनने दिलेल्या व्यासपीठाबद्दल आणि संधीबद्दल आयोजकांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.






