Home भंडारा 26 नोव्हेंबर ला भंडारा येथील संत तुकाराम सभागृहात संविधान दिन अमृत महोत्सवाचे...

26 नोव्हेंबर ला भंडारा येथील संत तुकाराम सभागृहात संविधान दिन अमृत महोत्सवाचे आयोजन

131

आशाताई बच्छाव

1002230962.jpg

26 नोव्हेंबर ला भंडारा येथील संत तुकाराम सभागृहात संविधान दिन अमृत महोत्सवाचे आयोजन

संजीव भांबोरे
भंडारा- शहरातील संत तुकाराम सभागृह (बावणे कुणबी समाज) पोलीस स्टेशनच्या मागे भंडारा येथे 26 नोव्हेंबर 2025 रोज बुधवार ला दुपारी 1 वाजता संविधान दिन अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सविस्तर वृत्त असे की, 26 जानेवारी 19 50 ला स्वतंत्र भारताची स्वतंत्र राज्यघटना आपल्या देशात लागू करण्यात आली. त्याला 26 जानेवारी 2025 ला 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवानिमित्ताने 26 नोव्हेंबर 2025 ला भारतीय राज्यघटना व नागरिकांची जबाबदारी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. संजय शेंडे लेखक व संविधान अभ्यासक नागपूर, प्रमुख पाहुणे म्हणून उमेश कोराम संयोजक ओबीसी युवा अधिकार मंच यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील. करिता या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संविधान शाखा यशोदा नगर भंडारा ,शाखाप्रमुख विष्णुदास जगनाडे, डॉ बाळकृष्ण सार्वे, गोपाल सेलोकर,वामनराव गोंधुळे, संजय मोहतुरे, इंजिनियर त्र्यंबकराव घरडे, सदानंद इलमे, ओबीसी सेवा संघ, जनगणना परिषद ,ओबीसी जागृती संघ ,ओबीसी क्रांती मोर्चा युथ फार सोशल जस्टीस भंडारा ,संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा यांनी केलेले आहे.

Previous articleनाशिक जिल्हा परिषदेची एकल महिलांसाठीची संवेदनशील आणि परिवर्तन घडवणारी चळवळ
Next articleशाहिरी लोक कला मंचा तर्फे नवीन कार्यकारणी मध्ये स्वारीता पाटकर यांची नियुक्ती.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.