Home Breaking News दिल्ली : लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ स्फोट | राजधानी दिल्ली मध्ये मोठा...

दिल्ली : लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ स्फोट | राजधानी दिल्ली मध्ये मोठा स्फोट… 10 जणांचा मृत्यू झाल्याची भीती.. वाहनांचा कोळसा..

139

आशाताई बच्छाव

1002179996.jpg

दिल्ली : लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ स्फोट |
दिल्ली (वृत्तसंस्था)-राजधानी दिल्ली मध्ये मोठा स्फोट… 10 जणांचा मृत्यू झाल्याची भीती.. वाहनांचा कोळसा..

नवी दिल्ली येथील लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट नंबर एक जवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या बॉम्बस्फोटात 10 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला.

ज्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते तेथेच हा स्फोट झाल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “आज संध्याकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील सुभाष मार्ग चौकात एका ह्युंदाई i20 कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात काही पादचाऱ्यांना दुखापत झाली असून काही वाहनांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अहवालानुसार, काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर केवळ १० मिनिटांत दिल्ली क्राइम ब्रांच आणि स्पेशल ब्रांचच्या टीम्स घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर NSG, NIA आणि FSLच्या टीम्सनी तपास सुरू केला आहे. सर्व जवळील CCTV कॅमेऱ्यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री यांनी दिल्लीचे पोलिस आयुक्त आणि स्पेशल ब्रांचचे अधिकारी यांच्याशी संवाद साधला आहे. ते दोघेही सध्या घटनास्थळी उपस्थित आहेत. संभाव्य दिशांनी तपास सुरू केला आहे आणि कोणतीही शक्यता दुर्लक्षिली जाणार नाही. सखोल तपासानंतर जनतेसमोर संपूर्ण माहिती सादर केली जाईल, असे अमित शहा म्हणाले

Previous articleYuva-Maratha-09-to-15-Nov-2025
Next articleराष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजसेवी संस्थेकडून रक्तदान शिबिराचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.