आशाताई बच्छाव
सामाजिक कार्य करणार्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी पक्षात संधी देऊ-अरविंद चव्हाण
मोदीखाना भागातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)- जालना आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सामाजिक कामात अग्रसेर असणार्या युवकांना जनतेची सेवा करण्याची संधी देऊ अशी गवाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) चे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी दिली गुरुवार रोजी पक्ष जिल्हा कार्यालयात शहरातील मोदीखाना भागातील युवकांची जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला यावेळी श्री चव्हाण यांनी मोलाचे मार्गदर्शन केल.े युवक सामाजिक कार्यकर्ते योगेश हिवाळ, सचिन शिरसागर,अमोल गोणे, दुर्गेश काटकर,कार्तिक खडेवार,अक्षय गोणेकर, बबलू लोळगे, कैलास कदम अशोक नवपुते, राम खरात,यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला याप्रसंगी जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण व शहर जिल्हाध्यक्ष शेख मेहमूद यांनी कार्यकर्त्यांचा शाल, पुष्पहार घालून स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






