Home जालना गोवा राज्यात ५ कोटीच्या गुन्ह्यातील आरोपी जालन्यात जेलबंद चंदनझीरा पोलीस व गोवा...

गोवा राज्यात ५ कोटीच्या गुन्ह्यातील आरोपी जालन्यात जेलबंद चंदनझीरा पोलीस व गोवा सायबर क्राईम पोलिसांची कार्यवाही

126

आशाताई बच्छाव

1002169796.jpg

गोवा राज्यात ५ कोटीच्या गुन्ह्यातील आरोपी जालन्यात जेलबंद चंदनझीरा पोलीस व गोवा सायबर क्राईम पोलिसांची कार्यवाही
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
पोलीस ठाणे सायबर क्राईम गोवा गु.रं.न.३५/२०२५ कलम ३१८(४),३१९(२)R/W,३(५) भारतीय न्याय संहिता तसेच कलम ६६(D)IT ACT प्रमाणे गोवा सायबर क्राईम येथे ५ कोटी रुपयांचा ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल होता सदर गुन्हा घडल्यापासून यातील आरोपी हा फरार होते.
काल दिनांक ०६/११/२०२५ जुनी रोजी गोवा सायबर क्राईम येथील पोलीस चंदनझिरा पोलीस टीम यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब पवार यांनी वरचे वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ आरोपीचा शोध करीत पथक तयार करून कसून शोध घेऊन आरोपी नामे अविष्कार देविदास सुरडकर वय पंचवीस वर्ष राहणार जवळवाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना यांचा शोध घेऊन त्या सीताफेने विशाल कॉर्नर येथून ताब्यात घेऊन केलेल्या सायबर गुन्हा संदर्भाने विचारपूस करून गोवा सायबर क्राईम यांनी कायदेशीर कार्यवाही करून इतर आरोपी व गुन्ह्याचे तपास कामी आरोपीस गोवा येथे घेऊन गेले आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बंसल साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी साहेब, मा.पोलीस उपअधीक्षक श्री अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे चंदनझिरा येथील पोलीस निरिक्षक श्री बाळासाहेब पवार यांचे नेतृत्वात पोलीस हेकॉ. कृष्णा तंगे,पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक जाधव तसेच गोवा सायबर क्राईमचे पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास डिकोस्टा,पोलीस हेडकॉन्स्टेबल विराज नार्वेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल वीरेंद्र वाडकर यांनी केली आहे.