Home उतर महाराष्ट्र बाभळेश्वरमध्ये दुग्धयोगी मा. श्री. रावसाहेब नाथाजी पा. म्हस्के यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा आणि...

बाभळेश्वरमध्ये दुग्धयोगी मा. श्री. रावसाहेब नाथाजी पा. म्हस्के यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा आणि कै. नाथाजी पा. म्हस्के पुतळा अनावरण सोहळा उत्साहात संपन्न

84

आशाताई बच्छाव

1002153687.jpg

राहता/ श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी- दुग्धयोगी मा. श्री. रावसाहेब नाथाजी पा. म्हस्के यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा आणि कै. नाथाजी पा. म्हस्के पुतळा अनावरण सोहळा उत्साहात संपन्न

बाभळेश्वर येथे आज दुग्धयोगी रावसाहेब नाथाजी पा. म्हस्के यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याचा आणि कै. नाथाजी पा. म्हस्के यांच्या पुतळा अनावरणाचा भव्य सोहळा उत्साहात पार पडला.
या सोहळ्याला खासदार निलेश लंके, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, तसेच दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे हे मान्यवर प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी भूषविले.
कै. नाथाजी पा. म्हस्के यांच्या पुतळ्याचे अनावरण माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या प्रसंगी सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आणि सोहळ्याचे औचित्य साधत “शरदपर्व – सारथी अमृतरथाचे” या गौरवग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले.
रावसाहेब नाथाजी म्हस्के यांच्या कार्याचा गौरव देखील करण्यात आला.
प्रसंगी आमदार आशुतोष काळे, विधानपरिषदेचे माजी आमदार सुधीर तांबे, बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, प्रभावतीताई घोगरे, शालिनीताई विखे पाटील तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण बाभळेश्वर गावाने या ऐतिहासिक सोहळ्याला मोठा प्रतिसाद दिला आणि म्हस्के परिवारावर शुभेच्छांचा वर्षाव केला.या सोहळ्याने बाभळेश्वरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात एक सुवर्ण पान जोडले गेले, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
“बाभळेश्वरमध्ये पार पडलेला हा सोहळा केवळ गौरवाचा नव्हे, तर समाजातील प्रेरणादायी कार्याचा सन्मान करणारा ठरला.