Home नाशिक मुंबई ची अंजली अहिरे नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित

मुंबई ची अंजली अहिरे नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित

132

आशाताई बच्छाव

1002034184.jpg

मुंबई ची अंजली अहिरे नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित

मनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने पुरस्कार सोहळा संपन्न

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी

सामाजिक कार्यात सदैव अग्रस्थानी असलेल्या घाटकोपर येथील सामाजिक कार्यकर्त्या अंजली अहिरे यांना सामाजिक कार्याची विशेष दखल घेत म्हणून संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या शुभहस्ते नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मनू मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबादास जी खैरे ,शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक शिलावंती (माई) कैलास त्रिभुवने, ज्येष्ठ समाजसेविका, मनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक सौ मेघाताई राजेश शिंपी यांच्या शुभहस्ते व श्रीमती मंजू राखाडी, श्रीमती धनश्री गायधनी, सौ सोनाली थोरात, कायदेशीर सल्लागार ॲड विनया नागरे कार्याध्यक्ष मीराताई ज्ञानेश्वर आवारे, रुपाली कोठुळे, राजेश शिंपी, वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे सर यांच्या उपस्थितीत नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराबद्दल त्यांना आकर्षक फेटा, ट्रॉफी, सन्मानचिन्ह, गुलाब पुष्प व ओटी भरण देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार देण्यात आला आहे अशी माहिती मनू मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका मेघाताई शिंपी यांनी दिली आहे.
विविध क्षेत्रातील महिलांना नवरात्रीनिमित्त नवदुर्गा पुरस्काराने दरवर्षी मनू मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सन्मानित केली जाते याचाच एक भाग म्हणून पंचवटी नाशिक हिरावाडी रोड येथील दीपलक्ष्मी मंगल कार्यालयात विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील ६४ महिलांना नवदुर्गा पुरस्कार तर ९ महिलांना विशेष नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.नवदुर्गा पुरस्कारासाठी विश्व हिंदू रक्षा संघटन मंडळ डेप्युटी कमिशनर संजयजी घुमरे, लेखक सुहास टिपरे, पत्रकार रामभाऊ आवारे (प्रदेश प्रसिद्धीप्रमुख वारकरी मंच महाराष्ट्र राज्य) ,अग्निशामक दलाचे संजय कानडे, नाशिक स्टार न्यूजचे उप संपादक नानासाहेब देवरे, शरद पवार, नाना पवार, जयश्री चौधरी यांना सन्मानित करून आपली उपस्थिती दर्शविली.
यावेळी सौ.दिपाली गणेश नागापुरे ,सौ.मनोरमा अजिंक्य पाटील. सौ निशिगंधा पाटील.सौ.हर्षदा प्रशांत सोनवणे. सौ.यमुना लिंगायत, अश्विनी किसनराव पुरी,सौ स्वाती अजय सावंत.सौ.रंजना चंद्रमोरे.सौ.कविता गायके या नऊ विशेष नवदुर्गा यांना ट्रॉफी ,सर्टिफिकेट ,ओटी, गुलाब पुष्प देऊन व फेटा बांधून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सौ. मेघा शिंपी संस्थापिका, श्री राजेश शिंपी, ॲड.विनया नागरे, मिरा आवारे, रुपाली कोठूळे, कविता बाविस्कर, पत्रकार श्री.रामभाऊ आवारे, श्री.शरद पवार, श्री.नाना पवार,तनु शेख, लीना गिरमे, सुनिता पाठक, कविता गुंजाळ, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मयुरी शुक्ला यांनी केले. सौ मेघा शिंपी यांनी आभार मानले.शेवटी लावणी व देवी नमन स्तवन करून कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Previous articleसौ रुपाली कोठुळे यांना मनु मानसी संस्थेचा नवदुर्गा पुरस्कार
Next articleकारचे पंक्चर काढत असताना भरधाव वाहनाची धडक; कोळगावच्या युवकासह दोघांचा मृत्यू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.