Yuva maratha news
व-हाणे ग्रामपंचायतीच्या आडमुठेपणाच्या निषेधार्थ सोमवार पासून पंचायत समिती समोर युवा मराठा महासंघाचे आमरण उपोषण आंदोलन
मालेगाव प्रतिनिधी : व-हाणे,ता.मालेगाव येथील ग्रामपंचायतीच्या आडमुठेपणा च्या धोरणामुळे युवा मराठा महासंघाने मालेगाव पंचायत समिती कार्यालयासमोर सोमवार ६ आँक्टोबर पासून आमरण उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
महासंघाने संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,व-हाणे गावच्या रहिवाशी असलेल्या निराधार विधवा महिला श्रीमती अलका शांतीलाल बच्छाव यांना ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व गावातील जाणकार नागरिकांनी मंजूर असलेले घरकुल बांधकामासाठी जागा मोजणी व आखणी करून दिली , वास्तविक हि शासकीय गावठाण जागा अलका बच्छाव यांच्या ताब्यात व वापरात सुमारे पाच वर्षांपासून आहे.त्याबाबत सन २०२० मध्ये मासिक मिटींगचा ठराव करून सदरची जागा अलका बच्छाव यांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे.असे असताना आँगस्ट २०२५ महिन्यात पुन्हा अलका बच्छाव यांच्या कडून जागा मागणी अर्ज घेण्यात येऊन ग्रामपंचायत दप्तरी दाखल करून घेतल्यावर सुध्दा आजपर्यंत अलका बच्छाव यांना ग्रामपंचायतीने अर्जानुसार झालेल्या ग्रामसभेचा ठराव आणि प्रोसेडिंग नक्कल दिलेली नाही.ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी संजीव घोंगडे व कर्मचारी हेतूपुरस्सर अडवणूक करून निराधार महिलेस वेठीस धरत असल्याने भविष्यात होणाऱ्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी ग्रामपंचायत व-हाणे व ग्रामपंचायत अधिकारी घोंगडे तसेच कर्मचाऱ्यांची राहिल असेही निवेदनातून नमूद करण्यात आले आहे.
तर ग्रामपंचायत अधिकारी घोंगडे व कर्मचाऱ्यांच्या आडमुठेपणाच्या निषेधार्थ हे उपोषण आंदोलन छेडले जाणार असल्याचे शेवटी महासंघाने निवेदनातून नमूद केले आहे.