Home गुन्हेगारी देवळा तालुक्याच्या हद्दीत चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरचा जालना जिल्ह्यातून जप्त . देवळा पोलिसांची...

देवळा तालुक्याच्या हद्दीत चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरचा जालना जिल्ह्यातून जप्त . देवळा पोलिसांची दमदार कामगिरी

84

आशाताई बच्छाव

1002012234.jpg

देवळा तालुक्याच्या हद्दीत चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरचा जालना जिल्ह्यातून जप्त . देवळा पोलिसांची दमदार कामगिरी
देवळा प्रतिनिधी भिला आहेर:- येवला तालुक्यातील अंदरसुल येथील अनिल ओमकार दळे यांनी देवळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर एम एच १५ बी एस ७३५१ हा गेल्या दोन महिन्यांपासून देवळा तालुक्यातील सुभाषनगर येथील सुनील बाळू अहिरराव यांचेकडे शेतीकामासाठी घेऊन आलेले असता ८ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सदरचा ट्रॅक्टर चोरून नेला याबाबत देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर१८८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर,कळवणचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी गुन्हा उघडकीस आणण्याबत सूचना व मार्गदर्शन केले. त्यानुसार देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते,पोलीस हवालदार भास्कर सोनवणे,संदीप चौधरी यांनी तपासाची चक्रे फिरवली असता सी सी टीव्ही च्या आधारेशोध घेतला असता हा ट्रॅक्टर व ट्रॉली मनमाडमार्गे नगर रोडने गेल्याचे निष्पन्न झाले सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना माहिती मिळाली की छत्रपती संभाजीनगर स्थानिक गुन्हे शाखेनेदरोड्याचा तयारीत असताना दोन आरोपी अमोल सायराम गायकवाड व गोविंद निवृत्ती पवार दोन्ही राहणार बेलगाव ता. वैजापूर यांना अटक करण्यात आलेली होती तपासात ते नाशिक जिल्ह्यात आल्याचे उघड झाल्याने सदर ट्रॅक्टर चोरी केल्याचा संशय बळावल्याने सदर आरोपींना छत्रपती संभाजी नगर येथून वर्ग करून ताब्यात घेण्यात आले व त्यांना अटक करण्यात आली तपासात सदर आरोपींनी गुन्हा केल्याची कबूली दिली व सदर ट्रॅक्टर व ट्रॉली चोरी करत घेऊन जाऊन गाव बाजारवाहेगाव ता.बदनापूर जि. जालना याठिकाणी लपवून ठेवलेबाबत कबुली दिली पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांचे सूचनेनुसार बाजारवाहेगाव याठिकाणाहून आरोपींसह चोरीस गेलेला स्वराज ट्रॅक्टर ६ लाख ५० हजार रुपये किंमतीचा व निळ्या रंगाची ट्रॉली हस्तगत करण्यात आली सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १० ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीनकस्टडीदेण्यात आली आहे सदरची कामगिरी देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांचे मार्गदर्शन व सूचनेनुसार पोलीस हवालदार भास्कर सोनवणे व संदीप चौधरी यांनी केली आहे त्यांच्या या कामगिरीने त्यांच्या वरिष्ठ पथकाने त्यांचे कौतुक केले आहे.

Previous articleमनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने नवदुर्गांचा पुरस्काराने सन्मान
Next articleधर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, ‘
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.