आशाताई बच्छाव
मनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने नवदुर्गांचा पुरस्काराने सन्मान
९ महिलांना विशेष नवदुर्गां पुरस्कार तर ६४ महिलांना नवदुर्गा पुरस्कार
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी
पुरस्कार प्रेरणा देतात पुरस्काराने नवी उमेद नवी आशा जागृत होऊन अधिक जोमाने काम करण्याची प्रबळ इच्छा उत्पन्न होते. म्हणून विविध क्षेत्रातील महिलांना नवरात्रीनिमित्त नवदुर्गा पुरस्काराने दरवर्षी मनू मानसी महिला व उद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सन्मानित केली जाते याचाच एक भाग म्हणून पंचवटी नाशिक हिरा वाडी रोड येथील दीपलक्ष्मी मंगल कार्यालयात विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील ६४ महिलांना नवदुर्गा पुरस्कार तर ९ महिलांना विशेष नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे अशी माहिती मनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ मेघाताई राजेश शिंपी, कायदेशीर सल्लागार ॲड विनया नागरे व कार्याध्यक्ष सौ मीराताई ज्ञानेश्वर आवारे यांनी दिली आहे.
मनु मानसी महिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्था नाशिक यांच्या वतीने आयोजित नवदुर्गा पुरस्कार उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. शक्ती अंगी येते आई तुझे नाव घेता, चैतन्य अंगी येते तुझे रूप पाहता, संकटे सर्व मिटून जातात तुझे स्मरण करताच. लक्ष्मीचा वास, सरस्वतीची साथ, गणपतीचा वास आणि दुर्गा मातेचा आशीर्वाद घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
मनु मानसी संस्थेच्या वतीने शारदीय नवरात्रीनिमित्त नवदुर्गा पुरस्कार दीपलक्ष्मी मंगल कार्यालय हिरावाडी रोड जुना आडगाव नाका पंचवटी येथे नवदुर्गा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.अंबादास दादा खैरे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस युवक नेते, मा.डॉ.शेफाली ताई भुजबळ, मा. सौ. शिलावंतीमाई त्रिभुवने तसेच विशेष उपस्थिती सहकार्य मा मंजू जाखाडी, मा.धनश्री गायधनी आणि मा सोनाली थोरात यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि देवी मातेचे पूजन आणि आरती करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत करून त्यांना ट्रॉफी, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी मा.अंबादास खैरे दादा यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.याप्रसंगी त्यांनी सर्व नवदुर्गा पुरस्कारार्थी महिलांना शुभेच्छा दिल्या.
नवदुर्गा पुरस्कारासाठी विश्व हिंदू रक्षा संघटन मंडळ डेप्युटी कमिशनर संजयजी घुमरे, लेखक सुहास टिपरे, पत्रकार रामभाऊ आवारे (प्रदेश प्रसिद्धीप्रमुख वारकरी मंच महाराष्ट्र राज्य) ,अग्निशामक दलाचे संजय कानडे, नाशिक स्टार न्यूजचे उप संपादक नानासाहेब देवरे, शरद पवार, नाना पवार, जयश्री चौधरी यांना सन्मानित करून आपली उपस्थिती दर्शविली.
सौ.दिपाली गणेश नागापुरे ,सौ.मनोरमा अजिंक्य पाटील. सौ निशिगंधा पाटील.सौ.हर्षदा प्रशांत सोनवणे. सौ.यमुना लिंगायत, अश्विनी किसनराव पुरी,सौ स्वाती अजय सावंत.सौ.रंजना चंद्रमोरे.सौ.कविता गायके या नऊ विशेष नवदुर्गा यांना ट्रॉफी ,सर्टिफिकेट ,ओटी, गुलाब पुष्प देऊन व फेटा बांधून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या ६४ मैत्रिणींना ट्रॉफी ,सर्टिफिकेट, ओटी ,फेटा बांधून गुलाब पुष्प देऊन नवदुर्गा पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सौ. मेघा शिंपी संस्थापिका, श्री राजेश शिंपी, ॲड.विनया नागरे, मिरा आवारे, रुपाली कोठूळे, कविता बाविस्कर, पत्रकार श्री.रामभाऊ आवारे, श्री.शरद पवार, श्री.नाना पवार,तनु शेख, लीना गिरमे, सुनिता पाठक, कविता गुंजाळ, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मयुरी शुक्ला यांनी केले. सौ मेघा शिंपी यांनी आभार मानले.शेवटी लावणी व देवी नमन स्तवन करून कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली . कार्यक्रमासाठी सर्व उपस्थितांनी अल्पोहार घेतला.