Home नाशिक रोझे गावातील अतिवृष्टी ग्रस्तांना भरीव मदत देण्याच्या मागणीसोबतच विकासकामांसाठी आ.कांदे यांना निवेदनाव्दारे...

रोझे गावातील अतिवृष्टी ग्रस्तांना भरीव मदत देण्याच्या मागणीसोबतच विकासकामांसाठी आ.कांदे यांना निवेदनाव्दारे साकडे

63

आशाताई बच्छाव

1002008140.jpg

रोझे गावातील अतिवृष्टी ग्रस्तांना भरीव मदत देण्याच्या मागणीसोबतच विकासकामांसाठी आ.कांदे यांना निवेदनाव्दारे साकडे
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगाव: रोझे ता.मालेगाव येथील अतिवृष्टीत पिकांचे अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची भरीव मदत मिळावी या मागणी सोबतच रोझे गावातल्या विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे साकडे आज एका निवेदनाद्वारे रोझे ग्रामस्थांनी आ.कांदे यांच्याकडे घातले आहे.
याबाबत सविस्तर असे की, परतीच्या पावसाने रोझे येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या तोंडातून हिरावला गेला आहे.म्हणून शेतकऱ्यांना तातडीची भरीव मदत करण्याबरोबरच रोझे गावातील विविध विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी रोझे येथील सरपंच सौ.सुमनताई अभिमन्यू गायकवाड, नामदेव उगले, सोमनाथ उगले, राजाराम घुगे,अभिमन्यू काळू गायकवाड आदींनी आमदार सुहास कांदे व ज्ञानेश्वर कांदे यांची भेट घेऊन प्रत्यक्षदर्शी निवेदन देऊन सदर मागणी केली आहे.

Previous articleचंद्रपूर आणि गडचिरोली नवीन इंडस्ट्रियल मॅग्नेट”
Next article…..प्रेरणादायी लेख…….. शहीद ए आजम भगत सिंग*: *युवापिढीसाठी प्रेरणास्त्रोत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.