Home जालना तालुकास्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धेत आदर्श विद्यालयाचा विद्यार्थी सोफियान कलीम शेख याने पटकावला...

तालुकास्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धेत आदर्श विद्यालयाचा विद्यार्थी सोफियान कलीम शेख याने पटकावला प्रथम क्रमांक

79

आशाताई बच्छाव

1002004078.jpg

तालुकास्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धेत आदर्श विद्यालयाचा विद्यार्थी सोफियान कलीम शेख याने पटकावला प्रथम क्रमांक
गजेंद्र लोखंडे तालुका प्रतिनिधी भोकरदन
भोकरदन येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा चालू असून या क्रीडा स्पर्धेमध्ये अनेक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे व वेगवेगळ्या गटामध्ये स्पर्धा भरवल्या जात आहे अशाच वय 17 वजन गट 110 मध्ये आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आव्हाना या विद्यालयाच्या विद्यार्थी सोफियान कलीम से याने कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून त्याची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल आदर्श विद्यालयाच्या शिक्षक श्री जंजाळ सर मतकर सर शिंदे सर व त्यांचे काका शेख हरून यांच्या वतीने व विद्यार्थ्यांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला तसेच आव्हाना येथील नागरिकांच्या वतीने त्याचे खूप खूप अभिनंदन करण्यात आले असून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहे सोफियान कलीम शेख यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मिळवलेल्या यशामध्ये शाळेतील शिक्षक व त्यांचे काका शेख हरून तसेच स्वतःची मेहनत रोज सकाळी दोन ते तीन तास व सायंकाळी एक ते दोन तास प्रॅक्टिस करत असतो या जोरावरती त्यांनी यश मिळवल्याचे सांगितले