आशाताई बच्छाव
ग्राम मोहगव्हाण येथे अवैध गावठी देशी दारू अड्ड्यावर अनसिंग पोलीस स्टेशनची बेधडक कारवाई…
अवैध दारू विक्री करणाऱ्या इसमावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल
वाशिम गोपाल तिवारी ब्युरो चीफ
मा.पोलीस निरीक्षक अमर चोरे (दबंग ठाणेदार) यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून ग्राम मोहगव्हाण येथे अवैध गावठी हातभट्टी दारू सुरू असल्या बाबत मिळालेल्या बातमीवरून त्यांनी पथक नेमून सदर ठिकाणी पथक रवाना करून ग्राम मोहगव्हाण येथे प्रो रेड करून दोन इसमा जवळून 1510 लिटर मोहमाच सडवा , हातभट्टी दारू व दारू काढण्याची सामग्री असा एकूण 1,51,000/- रू मुद्देमाल मिळून आला. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधीक्षक विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमर चोरे,सहायक पोलीस निरीक्षक राहुल शेजव,उकळी पेन बीट जमादार जगन्नाथ खंडारे तसेच गुन्हे अन्वेषण पथकातील कर्मचारी किशोर सूर्यवंशी ,दादाराव भोयर,अरविंद साबळे, अरुण गवळी यांनी केली असून सदर कारवाईमुळे अवैद्य दारू विक्री करणाऱ्यांवर वचक निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.