आशाताई बच्छाव
भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहर तर्फे सेवा पंधरवाडा या उपक्रमांतर्गत गडचिरोली शहरातील स्थानिक नगर परिषद प्राथमिक शाळा लांझेडा येथे भव्य आरोग्य शिबिर
आरोग्य शिबिरातून मातृशक्तीच्या आरोग्य संवर्धनाचा नवा संदेश समाजात पोहचेल
आमदार डॉ.मिलिंदजी नरोटे यांनी वैक्त केला विश्वास
पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अभियाना अंतर्गत
अनिल जी कुनघाडकर भाजपा शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वात शिबिराचे आयोजन
गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ : देशगौरव पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवाडा अभियानाअंतर्गत गडचिरोली शहर लांझेडा येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शहरातील व जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत उत्तम आरोग्य सुविधा पोहोचविणे हीच खरी जबाबदारी असून यासाठी मी नेहमी प्रयत्नशील आहे.या शिबिरातून मातृशक्तीच्या आरोग्य संवर्धनाचा एक नवा संदेश समाजात पोहचेल असा विश्वास आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी वैक्त केला.
या शिबिराला कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन तपासणीसह विविध आजारांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थितांना आरोग्य विषयक जनजागृती करण्यात आली.
या शिबिराला प्रमुख उपस्थिती लाभली : जिल्हा अध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, माजी आमदार डॉ. नामदेवजी उसेंडी, राज्य परिषद सदस्य चंदाताई कोडवते, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांतजी वाघरे, ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे, जिल्हा महामंत्री गीता ताई हिंगे, जिल्हा उपाध्यक्ष अनिलभाऊ पोहनकर, शहराध्यक्ष तथा माजी नगर परिषद गडचिरोली उपाध्यक्ष अनिलभाऊ कुनघाडकर तसेच शहरातील जिल्हा पदाधिकारी तसेच शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी वॉर्डातील दिव्यांगांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.