Home नाशिक शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या नासिक जिल्हा समन्वयक पदी रामायणाचार्य हभप भास्कर नाना...

शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या नासिक जिल्हा समन्वयक पदी रामायणाचार्य हभप भास्कर नाना रसाळ

129

आशाताई बच्छाव

1001999225.jpg

  1. शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या नासिक जिल्हा समन्वयक पदी रामायणाचार्य हभप भास्कर नाना रसाळ
  2. दैनिक युवा मराठा
    निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी

शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचा राज्यविस्तार मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून, संपूर्ण महाराष्ट्रभरातील २०० पेक्षा अधिक साधुसंत व कीर्तनकार या सेनेशी जोडले गेले आहेत. राज्याच्या इतिहासातील ही सर्वात मोठी साधुसंतांची राजकीय पक्षाशी थेट समन्वय असणारी संघटना ठरली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात वारकरी संप्रदायासह महानुभव, दत्त, शीख, गो सेवक तसेच इतर ५० पेक्षा अधिक संप्रदायांच्या उपक्रमांना सहाय्यभूत ठरणारे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्या प्रत्येक संप्रदायाशी अधिक घट्ट समन्वय साधण्यासाठी शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचा राज्यव्यापी विस्तार करण्यात आला आहे.या निमित्ताने अक्षय महाराज भोसले यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष व शिवसेना पक्ष प्रवक्ता म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज व संत एकनाथ महाराज यांच्या वंशजांचा ही या संघटनेत थेट सहभाग असून, हे पाऊल अध्यात्मिक क्षेत्रातील एक ऐतिहासिक पर्व ठरले आहे.
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील आहेरगाव तालुका निफाड येथील सुप्रसिद्ध रामायणाचार्य हभप भास्कर महाराज (नाना) रसाळ यांची नासिक जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र शिवसेना पक्ष सचिव संजय मोरे यांनी जाहीर केले. स्थानिक पातळीवर दांडगा जनसंपर्क व अनेक वर्षांपासून अध्यात्मिक क्षेत्रात दिलेले योगदान या महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील प्रत्येक प्रार्थनास्थळे व धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या समस्या थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचणार असून, संपूर्ण अध्यात्मिक क्षेत्रातून या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे.