Home बुलढाणा BREAKING बुलढाण्यात बस स्टँडच्या मागील चौकात युवकाचा चाकूने खून ! सुसंस्कृत बुलढाणा...

BREAKING बुलढाण्यात बस स्टँडच्या मागील चौकात युवकाचा चाकूने खून ! सुसंस्कृत बुलढाणा गुन्हेगारीच्या विळख्यात?

80

आशाताई बच्छाव

1001997892.jpg

BREAKING बुलढाण्यात बस स्टँडच्या मागील चौकात युवकाचा चाकूने खून ! सुसंस्कृत बुलढाणा गुन्हेगारीच्या विळख्यात?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा बुलढाणा शहरातील गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नाही. बस स्टँडमागील जांभरून रोडवरील चौकात काल रविवारी रात्री उशिरा पुन्हा रक्तरंजित हल्ला झाला. शुभम रमेश राऊत (27, रा. बुलढाणा) या तरुणाचा ऋषी जवरे या गुंड प्रवृत्तीच्या युवकाने चाकूने भोसकून खून केला. घटनास्थळी उसळलेल्या भीषण परिस्थितीने नागरिकांमध्ये
दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम राऊत बोथरा एमआरआय सेंटरमध्ये काम करत होता. रविवारी रात्री तो आपल्या मित्र बॉबीसह गावंडे हॉटेलमध्ये जेवत होता. त्याचवेळी हातात चाकू घेऊन नशेत असलेला ऋषी जवरे आला. त्याचे कुणाशी तरी वाद झाले होते. चाकू कुणाला तरी लागेल, या भीतीने शुभम त्याला थांबवायला गेला. मात्र भानावर नसलेल्या ऋषीने थेट शुभमच्या छातीवर चाकू खुपसला. यात बॉबीलाही जखम झाली, तर प्रतिकारादरम्यान ऋषीच्याही हाताला चाकू लागला.गंभीर जखमी झालेल्या शुभमला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तो मृत घोषित झाला. घटनेनंतर रुग्णालय परिसरात शुभमच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला व शेकडो नागरिकांनी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

गेल्या दीड महिन्यात बुलढाण्यातील दुसऱ्या चाकूहल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. १ ऑगस्टला चिखली रोडवर सनी जाधवचा चाकू हल्ल्यात मृत्यू झाला होता. वाढती गुन्हेगारी पाहता “सुसंस्कृत” बुलढाणा शहर आता गुन्हेगारीच्या विळख्यात तर सापडत नाही ना, असा प्रश्न सुज्ञ नागरिक उपस्थित करत आहेत.