आशाताई बच्छाव
मलकापूर शहरात एम. डी. ड्रग्ज बाळगणाऱ्या एकावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. पथकाने पकडले. MD ड्रग्ज संबंधाने जिल्ह्यातील पहिली कारवाई., किं. 41,400/-रु.चा मुद्देमाल हस्तगत.
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- मलकापूर जिल्ह्यात रासायनिक व ईतर तत्सम अंमली पदार्थांची वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्या समाज कंटकांचा शोध घेऊन त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते. सदर आदेशाप्रमाणे पोनि. श्री. सुनिल अंबुलकर स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करुन, त्यांना अंमली पदार्थ संबंधाने गोपनीय माहिती काट्न त्या बाबत कायदेशीर कार्यवाही करणेबाबत सुचित केले असता. सदर अनुषंगाने,
दि.25/09/2025 रोजी पो.स्टे. मलकापूर शहर येथे एम.डी. ड्रग्ज (मॅफेड्रॉन ड्रग्ज) संबंधाने बुलढाणा जिल्ह्यातील पहिली कारवाई करण्यात आली आहे सविस्तर वृत्त असे की दि.25/09/2025 रोजी पोनि. श्री. सुनिल अंबुलकर यांचे नेतृत्वात बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मलकापूर शहरात गस्त करीत असतांना, एक ईसम हा संशयास्पद हालचाली करुन, पोलीसांची गाडी पाहून पळून जात असतांना मिळून आला. वरुन सदर व्यक्ती पकडून, त्याची ओळख पटवून, त्याची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता, त्याचे जवळ आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक असे एम.डी. (मॅफेड्रॉन ड्रग्ज) ड्रग्ज मिळून आले. सदर व्यक्ती विरुध्द पो.स्टे. मलकापूर श. येथे एन.डी.पी.एस. अॅक्टचे कलम 8(क), 22(ब) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास पो.स्टे. मलकापूर श. करीत असून आरोपी मोहसीन ईजाज सैय्यद वय 27 वर्षे, ह.मु. पारपेठ गुरुव्दारा जवळ, मलकापूर जि. बुलढाणा. मुळ राहणार – शाहूनगर चाळ, मुंब्रा रेल्वे स्टेशनजवळ, ठाणे (दि.25/09/2025) या व्यक्तीजवळ मुद्देमाल :-
1) एम.डी. ड्रग्ज (मॅफेड्रॉन ड्रग्ज) वजन-6.25 ग्रॅम किं. 31,400/-रु.
2) मोबाईल एक नग किं. 10,000/-रु. एकूण किं. 41,400/-रु.चा मुद्देमाल.
जप्त केला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी मार्गदर्शन व कामगिरी पथक सदरची कार्यवाही मा.श्री. निलेश तांबे-पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेशान्वये तर श्री. अमोल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. श्री. सुनिल अंबुलकर स्था.गु.शा. बुलढाणा यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत पोउपनि. पोउपनि. अविनाश जायभाये, पोहेकॉ. दिपक लेकुरवाळे, शेख चाँद, गणेश पुरुषोत्तम पाटील, पोकॉ. गजानन गोरले, मपोकॉ. आशा मोरे, चापोना. सुरेश भिसे नेमणूक स्था.गु.शा. बुलढाणा, पोकॉ. ऋषीकेश खंडेराव तांत्रिक विष्लेषण विभाग बुलढाणा यांचे पथकाने केली.