आशाताई बच्छाव
धाराशिवचे जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यावर तात्काळ कार्यवाहीची मागणी
उमरगा: धाराशिव जिल्ह्यात पुर सदृश्य परिस्थिती असताना पुर्ण जिल्हा पाण्याखाली असुन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव नाचगाण्यात व्यस्थ होते.त्यामुळे शेतकऱ्यांच्या वतीने तिव्र संताप व्यक्त होत आहे.उपविभागिय अधिकारी शेवाळे यांच्या हस्ते मुख्यमंत्री निवेदन देण्यात आले.कालच धाराशिव जिल्ह्यातील कारी गावामध्ये एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळुन गळफास घेऊन आत्महत्या केली. जिल्हाभरात पुरामुळे हाहाकार माजलेला असुन ,अनेकांची घरे उधवस्त झालेली आहेत. जनावरे दगावली आहेत. शेतकऱ्यांचे कुटूंब आज उघड्यावर पडलेले असताना आज त्यांना एक वेळची भाकर मिळत नाही. असे असताना धाराशिव जिल्ह्यातील पुराच्या प्रत्येक मुव्हमेंटची माहिती जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्री यांना पोहचावयाचे सोडून नाचगाण्यात व्यस्त असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व नाराजी आहे. निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव याही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना महत्व देत नाहीत, दुर्लक्ष करतात.
तरी अश्या मुजोर आणि परिस्थितीचे गांभीर्य नसणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कार्यवाही करून त्यांना गडचिरोली येथे प्रमोशन देऊन पाठवावे. व यांच्यावर कार्यवाही नाही झाल्यास अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात ुवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने यांनी दिला आहे.यावेळी कृष्णा मोरे,नागेश पाटील, राहुल मन्नाडे,पवन भोसले, संजय राठोड आदी उपस्थित होते.






