आशाताई बच्छाव
ओला दुष्काळ जाहीर करा हेक्टरी ५० हजार मदत करा वसमत सरपंच संघटनेचे उपविभागीय अधिकारी माने यांना निवेदन.
हिगोली.श्रीहारी अंभोरे पाटील
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील सरपंच संघटनेचे च्या वतीने निवेदन देण्यात आले.कि वसमत तालुक्यातील सर्वंच भागात गेल्या दोन महिन्यांपासून सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.ढगफुटि सारखाच पाऊस कोसळत असल्यामुळे नदिनाले दुथडी भरून वाहत असताना सभोवताली शेतात पाणी शिरल्याने शेतातील पिकांची मोठी नुकसान झाले आहे त्याचबरोबर अनेकांचे शेतावरून घरी परतण्यासाठी नदिनाले ओलांडताना वाहुन जाऊन जिवगेला तर अनेकांचे कुटुंबातील जनजिवन विस्कळीत झाली आहे तर अनेकांच्या घरात पाऊसाचे पाणी शिरल्याने घराची पडझड व घरातील जिवन आवश्यक साहित्य खराब झाले तर सर्वच पिकांची परिस्थिती अधिक बेकार झाली आहे.त्यामुळे मुग उडीद सोयाबीन पिक १००%गेलै तर कापुस हाळद रोगास बळी पडल्याचे शेतकऱ्यांचे जिवंत पिके गेल्याने वसमत तालुक्यातील ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्याची कर्ज माफ व सरसगट हेक्टरी 50हजार रू आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी वसमत सरपंच संघटनेचे च्या वतीने आज वसमत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.