आशाताई बच्छाव
श्रीमद्भगवतगीता ज्ञान स्पर्धा परीक्षेचा पारितोषिक व सन्मानपत्र वितरण सोहळा
उरुळी कांचन पुणे,(प्रतिनिधी सुर्यकांत भोर):- सत्य, अहिंसा, समानता, मानवप्रबोधन व्यसनमुक्ती या श्रीमद्भवतगीतेच्या पंचतत्वाचा, तथा महाराष्ट्र शासनाच्या मूल्यशिक्षण धोरणांतर्गत प्रचार व प्रसार करून मानव जातीला सुसंस्कारित करण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून, पंचकृष्ण प्रबोधन परीषद जाळीचा देव व श्रीकृष्ण ज्ञान मंदिर चौधरी वस्ती उरुळी कांचन, महंत श्री.गोपालव्यास कपाटे महानुभाव यांचे संयुक्त विद्यमाने हा उपक्रम महात्मा गांधी महाविद्यालय उरुळी कांचन येथे एक महिन्यापुर्वी श्रीमद्भवतगीता ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षेत एक्कावन्न विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी झाले होते. सदर परीक्षेचा निकाल समाधानकारक लागला त्या अनुषंगाने आज महात्मा गांधी महाविद्यालय उरुळी कांचन येथे पारितोषिक व सन्मानपत्र वितरण समारंभ संपन्न झाला. त्यात अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढण्यात आले. त्यात मुस्लिम समाजाच्या मुलानेही श्रीमद्भवतगीता ज्ञान स्पर्धा परीक्षेत भाग घेवुन उत्तम गुण मिळवून पारितोषिक व सन्मानपत्र मिळवून आपल्याकडे असलेला सर्व धर्म समभाव दाखवून देत आपल्या बुध्दीकौशल्यातुन पटवून दीले त्याचाही विषेश सन्मान करण्यात आला. तसेच हा उपक्रम राबवत असतांना विषेश परीश्रम घेणारे वेळोवेळी मार्गदर्शन करणारे धर्माप्रती तळमळ असणारे पत्रकार अमोल भोसले यांचा महाराष्ट्र शासन व पंचकृष्ण प्रबोधन परीषद व महंत.श्री.गोपालव्यास कपाटे महानुभाव यांचे वतीने विशेष सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी महंत.श्री.गोपालव्यास कपाटे महानुभाव, प्राचार्य भारत भोसले, उपप्राचार्य विलास काशिद, पर्यवेकक्षिका संगिता शिर्के, दादासाहेब यादव, विमल कांचन, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.