Home जालना कोसगाव ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री स्वच्छता झाडू फावडा टोपली मोहीम

कोसगाव ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री स्वच्छता झाडू फावडा टोपली मोहीम

31

आशाताई बच्छाव

1001985269.jpg

कोसगाव ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री स्वच्छता झाडू फावडा टोपली मोहीम

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

दिनांक २३/०९/२०२५भोकरदन तालुक्यातील कोसगाव ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री सेवा पंधरावाडा अभियान हे गावात झाडू टोपली घेऊन स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ग्रामपंचायत येथे अभियान वृक्ष लागवड व स्वच्छता मोहिमेला विशेष महत्त्व देण्यात आले. गावातील नागरिक विद्यार्थ्यापासून ग्रामपंचायत पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते अशा सर्वांनी मिळून या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला व शाळकरी मुलांनी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारच्या झाडांची लागवड केली या अभियानामुळे गावात सामाजिक एक्य व पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक संदेश पसरला स्वच्छता हीच सेवा हरित गाव स्वच्छ गाव या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले या उपक्रमामुळे गावात विकासात्मक कार्यांना नवी दिशा मिळत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी गावातील सरपंच अशोक पाटील शिंदे व राधाबाई शिंदे चेअरमन, सुभाष शेळके व श्रीमती मीनल मेश्राम तलाठी व ग्रामसेवक गवई मॅडम राजू शिंदे ,भागवत शिंदे पत्रकार सुनील उंबरकर व गौतम वाघ पत्रकार व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जंजाळ सर आणि शिवाजी पट्टे सर सोनवणे सर, देठे सर शिक्षिका वर्ग वृद्ध व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे भोकरदन तालुका अध्यक्ष सुनील उंबरकर तथा पत्रकार इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleशिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयावर ढोल बजाव आंदोलन
Next articleजाफराबाद शहरात स्वच्छ्ता अभियान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.