Home जालना भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी साईनाथ तेलंगे

भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी साईनाथ तेलंगे

86

आशाताई बच्छाव

1001985248.jpg

भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी साईनाथ तेलंगे
जालना -वसंतराव देशमुख
दिनांक २४/०९/२०२५
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी छत्रपती संभाजीनगर येथील साईनाथ तेलंगे पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी छत्रपती संभाजी नगर येथे प्रदेश कार्यकारणीचे सदस्य संदीप शिंदे छत्रपती संभाजीनगरचे महानगर अध्यक्ष श्याम देशमुख यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली आहे. साईनाथ तेलंगे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असून अनेक सामाजिक कार्य त्यांच्या हातून झाले असल्याचे बोलले जाते याचीच दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये साईनाथ तेलंगे पाटील यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली यावेळी त्यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य संदीप शिंदे छत्रपती संभाजीनगरचे महानगर अध्यक्ष श्याम देशमुख हे यावेळी हजर होते. आपण भविष्यातही संघटनेच्या माध्यमातून भरीव कार्य करणार असल्याची ग्वाही यावेळी साईनाथ तेलंग यांनी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील बाबा यांना दिली.

Previous articleप.पु. श्री सद्गुरु देवेंद्रनाथ महाराज मंदिर साईनाथ नगर नेवासा मंदिराची कार्यकारणी जाहीर
Next articleशिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयावर ढोल बजाव आंदोलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.