आशाताई बच्छाव
तात्काळ महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
धाराशिव प्रतिनिधी:उमरगा तालुक्यातील नारंगवाडी मंडळात अतिवृष्टी घोषित करण्याबाबत शेतकऱ्यांनी आवाज उठविला आहे. पर्जन्यमापक यंत्र खराब झाल्यामुळे चुकीची आकडेवारी दाखवली जात असून खरी परिस्थिती प्रशासनापर्यंत पोहोचत नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
यासंदर्भात शेतकऱ्यांच्या वतीने उमरगा तहसिलदार गोविंद येरमे यांना निवेदन देण्यात आले. तात्काळ महाराष्ट्र शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.






