आशाताई बच्छाव
लातूर येथील अभाभ्रनिसंस च्या राष्ट्रीय अधिवेशनात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा : वसंतराव देशमुख
जालना प्रतिनिधी-मुरलीधर डहाके
दिनांक -११/०९/२०२५
याविषयी सविस्तर माहिती अशी की, अनेक वर्षांपासून लातूर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने राष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.तीच परंपरा कायम ठेवत याहीवर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर व १८ सप्टेंबर २०२५ असे दोन दिवशिय भव्य- दिव्य राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.या अधिवेशनाला राज्यातील तसेच देशातील अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थित रहाण्याचे आवाहन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.वसंतराव देशमुख यांनी केले आहे.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवम् ब्रिक्स मानव अधिकार मिशन च्या वतीने १७ आणि १८ सप्टेंबर रोजी लातुर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा सोहळा आणि राष्ट्रीय अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.या राष्ट्रीय अधिवेशनाला अखंड हिंदुस्थानातील संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहाणार आहेत.
या राष्ट्रीय अधिवेशनात स्वातंत्र्य सैनिकांचा यथोचित सत्कार, तसेच विरपत्नि,विरमातांचाही यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.यासोबतच संघटनचा प्रचार आणि प्रसार तसेच संघटनेच्या वाढीसाठी भरीव कामगिरी करणाऱ्या तसेच संघटना वाढीसाठी मेळावे, अभ्यास शिबिरे,मोर्चे काढले संघटनेच्या बांधनिसाठी सतत कार्यरत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा विविध क्षेत्रातील पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.अशी माहिती त्यांनी दिली आहे.
राष्ट्रीय महामेळाव्यासाठी अखंड भारतातील सर्व घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशातील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भ्रष्टाचाराच्या विरोधातील वेगळा संदेश घेऊन संपूर्ण देशभर पोहचविण्याचे काम करावे.तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवं ब्रिक्स मानव अधिकार मिशनच्या भारत देशातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व १७ सप्टेंबर व १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत प्रणवश्री मंगल कार्यालय लातूर येथे उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी केले आहे.