आशाताई बच्छाव
गिरगावातील महावितरण कंपनीच्या कामचुकार धोरणामुळे शेती उत्पादनावर परिणाम .
33 के .व्हि असुन विना इंजिनियर. 06 कर्मचारी ऐवजी 03कर्मचाऱ्यांवर चालतो गावाचा कार्यभार
हिंगोली . श्रीहरी अंभोरे पाटील हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गिरगाव शिवार परिसरातील कुषी क्षेत्रातील महावितरण कंपनीच्या काम चुकार धोरणामुळे शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याने शेतकर्या कडुन महावितरण कंपनी निवेदन देण्यात आले आहे.
तालुक्यातील सर्वात मोठी बागायती जमीन क्षेत्र गिरगावात असून त्यासाठी सिद्धेश्वर येलदरी व ईसापुर धरणातील कालव्याचे पाणी गिरगावतील सर्व परिसरामध्ये शेतीसाठी उपलब्ध आहे हे पाणी शेतीसाठी वापरल्या जात असते .एकुनच गिरगाव परिसरात शेती बागायती लाभक्षेत्र 3500 एकर जमिन बागायती शेती साठी वापरल्या जाते तर गिरगाव येथील शेतकरी यांची जमीन गावाबाहेर लागुनच असलेल्या कळमनुरी तालुक्यातील वडगाव शिवारात 150 एकर एवढी जमिन आहे हि पन जमिन बागाती आहे एकुण एवढ्या मोठ्या क्षेत्राला लाभक्षेत्रातील सिंचनासाठी केवळ 180 ते 190 कृषी पंप आहेत वापरात आहेत हि शोकांतिका केवळ महावितरणची नसुन शेतकऱ्यासाठी लोकप्रतिनिधी जबाबदारी तेवढिच आहे.केवळ जनता दरबार नागरीकांचे प्रश्न मार्गी लागतात अशा बातम्याही येत आहेत पण 2018पासुन या गावातील प्रलंबित असलेला प्रश्न अध्यापही मार्गी लागला नाही
गिरगाव परिसरातील जमीन सर्व बागायती असताना सुद्धा विद्युत पुरवठा उच्च वाहिनीने मिळत नसल्याचे निवेदन आजही महावितरण कंपनीला द्यावा लागत आहे कृषी क्षेत्रातील महावितरण कंपनीकडून व्यवस्थे संदर्भात अधिकचे कृषी पंप जोडता येत नाहीत यातच अनेक दिवसापासून कृषी पंपाला जोडणाऱ्या विद्युत पुरवठा करणार्या तारा अनेक ठिकाणी लोमकळलेल्या पाहायला मिळत आहे तर अनेक ठिकाणी व डीपीवरील पोल वाकल्यामुळे शेती मशागत ऊस किंवा केळीचे वाहन घेऊन जाताना मोठा अडथळा लोमकळ्या तारा मुळे होत असतो लाभ क्षेत्रातील जमिन सुपीक असल्याने या ठिकाणी केळी ऊस हळद असे बागायती पीक घेतल्या जाते परिसरामध्ये दोन कालव्याची पाणी येत असताना सुद्धा बागायती क्षेत्राला मार्च एप्रिल मे या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये विद्युत मागणी कृषी पंपासाठी उच्च दाबाने होत नाही त्यामुळे पाहिजे एवढा कमी विद्युत पुरवठा मिळत असतो .
त्यातच 24 कृषी पंपला विद्युत पुरवठा करणारी विद्युत वाहिनी वरील विद्युत पुरवठा हा नियमबाह्य लोड सेटिंग हा नियम घालून दिल्याने आठ होतो त्यातच आठ तासाऐवजी कधीकधी चार ते पाच तास लाईट कृषी क्षेत्रातील कृषी पंपाला मिळते त्यामुळे मोठा फटका बागायती पिकाला बसत असतो
डीपीवरील ओव्हरलोड किंवा तारा तुटणे या तांत्रिक बिघाडामुळे कृषी पंपाला विद्युत पुरवठा व्यवस्थित उच्च दाबाने मिळत नसल्याने कृषी पंप बिघडणे कृषी पंप जळणे तारा तुटणे अशा असंख्य समस्या शेतकऱ्यांसमोर उभे राहत असतात त्यातच गावपातळीवर 33.के. व्हि आसताना सुध्दा परमनंट इंजिनिअर नसल्याने व त्यातच एकुनच 6 कर्मचाऱ्याऐवजी तीन कर्मचाऱ्यावर एकूण कारभार चालतो त्यातच गावठाण कार्यक्षेत्रात 15 डीपीची संख्या आहे यातच वसुली बिघाड नवीन कनेक्शन व कृषी पंपातील तांत्रिक बिगड सर्व तीन कर्मचाऱ्यावर लोड येत असल्यामुळे अनेक काळ कृषी पंपातील बिघाड झाल्यामुळे शेतीला पाणी देता येत नाही त्यामुळे 33 .के.व्हि असून अडचण व नसुन खोळबा आहे 2018 पासुन सततच्या पाठपुराव्यानंतर हि कृषीप्रधान देशांमध्ये शेतीची दयनीय अवस्था आज हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव परिसरात पाहायला मिळत आहे