Home विदर्भ हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या पत्नीचे दुःखद निधन संपूर्ण...

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या पत्नीचे दुःखद निधन संपूर्ण लोकसभा मतदारसंघात शोककळा

79
0

आशाताई बच्छाव

1001940239.jpg

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या पत्नीचे दुःखद निधन
संपूर्ण लोकसभा मतदारसंघात शोककळा
हिंगोली .श्रीहारी अंभोरे पाटील
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. नागेश पाटील आष्टीकर त्यांची धर्मपत्नी सौ. सुषमा नागेश पाटील यांचे आज (दि. 10 सप्टेंबर 2025) रोजी सकाळी मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले.
गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या व त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु उपचाराला प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी अखेरचा श्वास मुंबई येथील हास्पिटल मध्ये घेतला त्यांच्या निधनाने हिंगोली लोकसभा मतदारसंघात दुःख डोंगर कोसळला आहे.
अंतिम दर्शन व अंत्यविधी:
त्यांचे पार्थिव आज सायंकाळपर्यंत मूळगावी आष्टी (ता. हदगाव, जि. नांदेड) येथे आणले जाणार असून उद्या (दि. 11 सप्टेंबर) सकाळी 10 वाजता आष्टी येथे त्यांच्या राहत्या घरी अंत्यविधी पार पडणार आहे. अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
सौ. सुषमा पाटील या अत्यंत कर्तव्यदक्ष, मनमिळावू आणि दातृत्वशील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जात होत्या. सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबीयांसोबतच समस्त समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांतता देवो. ओम् शांती।

Previous articleवसमत पोलिस स्टेशनमध्ये दाखविले अजब गजब खेळ
Next articleगिरगावातील महावितरण कंपनीच्या कामचुकार धोरणामुळे शेती उत्पादनावर परिणाम .
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here