आशाताई बच्छाव
हिंगोली. श्रीहरी अंभोरे पाटील
हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गारुड्याच्या खेळातील एका तरुणाने आपल्या डोक्याच्या केसाला दोरी बांधून पोलीस व्हॅन 20 फूट ओढत आणल्याचे त्या पोलीस स्टेशनमध्ये दाखवण्यात आले यावेळी पोलीस स्टेशन मधील पोलीस ठाणेदार सुधीर वाघ व ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे व सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर परिसरातील नागरिक सुद्धा हा खेळ पाहण्यासाठी उपस्थित होते डोक्याच्या केसाला दोरी बांधून पोलीस स्टेशन प्रांगणात पोलीस व्हॅन ओढत असल्याचे पाहिल्यानंतर सर्वांच्याच अंगावरती शहारे आलेले पाहायला मिळाले तर या तरुणाने फॅन ओढल्यानंतर पोलीस स्टेशन मधील सर्व कर्मचारी अधिकारी यांनी टाळ्या वाजवून या तरुणाचे स्वागत केले व त्याला उत्कृष्ट बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले