Home गडचिरोली लोकशाहीचा प्राण – माहिती अधिकार दिन साजरा करण्याची गडचिरोलीत जोरदार मागणी

लोकशाहीचा प्राण – माहिती अधिकार दिन साजरा करण्याची गडचिरोलीत जोरदार मागणी

75
0

आशाताई बच्छाव

1001937484.jpg

लोकशाहीचा प्राण – माहिती अधिकार दिन साजरा करण्याची गडचिरोलीत जोरदार मागणी

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 
२८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी हा दिवस साजरा करावा, यासाठी माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र समिती तर्फे मा. राज्यपाल, मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना ई-मेलद्वारे निवेदन व स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे. समितीने आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, माहिती अधिकार अधिनियम २००५ हा पारदर्शक व जबाबदार प्रशासन घडवून आणणारा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. याबाबत शासन निर्णय क्रमांक – केमाअ २००८/पत्र क्र. ३०८/०८/सहा व ३७८/०८/सहा दिनांक २० सप्टेंबर २००८ अन्वये जिल्हाधिकारी यांना दरवर्षी माहिती अधिकार दिन साजरा करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
यंदा २८ सप्टेंबर २०२५ हा दिवस रविवारवर येत असल्याने शासन आदेशानुसार माहिती अधिकार दिन २९ किंवा ३० सप्टेंबर २०२५ रोजी साजरा करावा अशी स्पष्ट मागणी समितीने केली आहे.
समितीच्या प्रमुख मागण्या :
१. जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना तातडीने आदेश निर्गमित करावेत.
२. माहिती अधिकारविषयक जनजागृतीसाठी कार्यशाळा, शपथविधी, प्रदर्शन व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

समितीचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोज उराडे यांनी स्पष्ट केले की, “माहिती अधिकार हा लोकशाहीचा प्राण आहे. नागरिकांना त्यांच्या हक्कांची खरी जाणीव व्हावी यासाठी हा दिवस प्रत्येक जिल्ह्यात सक्रीयतेने साजरा होणे अत्यावश्यक आहे.”

Previous articleमोशी येथे क्षितिज पार्क सोसायटी मध्ये गणरायाला मोठ्या भक्ती भावात निरोप…
Next articleजिजाऊ महिला सहकारी पत Branch चेअध्यक्ष पदी सौ मनिषा राजेश नंदपुरे यांची एकमताने निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here