आशाताई बच्छाव
वसमत मंगळवार बाजारातील व्यापारी व बाजारहाट पावसाने केली मोठी नुकसान
वसमत. श्रीहरी अंभोरे पाटील
वसमत आज मंगळवार असल्याकारणाने दर मंगळवारी वसमत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बाजार भरत असतो हा आठवडी बाजार हिंगोली जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेतील सर्वात मोठा बाजार वसमत या ठिकाणी आठवडी बाजारात सुरू असतो या ठिकाणी गाई म्हशी बैल गुरे छोटे-मोठे जनावरे छोटे-मोठे उद्योजक या ठिकाणी येत असतात यामध्येच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतातील उपलब्ध असलेले भाजीपाला मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी बाजारात असतो आठवडाभरा पुरेल एवढा भाजीपाला काही रोज मजूर शेतकरी छोटे-मोठे उद्योग वाले घरी घेऊन जात असतात त्या अपेक्षेने आज मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष्मीच्या नंतरचा हा मंगळवार असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदीला ग्रामीण भागातील औंढा नागनाथ पूर्ण संपूर्ण वसमत तालुका नांदेडचा काही भाग तर कळमनुरी तालुक्यातील काही भाग या बाजारपेठेला जोडलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये गर्दी असताना दुपारी बाराच्या नंतर सुरू झालेला दीड दोन तास पाऊस हा ढगफुटी सारखा कोसळला त्यामुळे बाजारातील छोट्या मोठ्या उद्योगवाल्यांचे व बाजारहाट करणाऱ्या भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करणाऱ्या बाजारातील अनेकांचे नुकसान झाले तर काही ठिकाणी बाजारातील विक्री बसलेल्या छोट्या मोठ्या दुकानात पाणी शिरल्याचेही दिसून आले त्यामुळे आज मंगळवार बाजारातील व्यापारी वर्गासोबतच खरेदीदारांचे सुद्धा मोठे नुकसान पाहायला मिळाले.