Home भंडारा पवनीत प्रत्येक सोमवारी होणार पालकमंत्र्यांचा जनता दरबार’

पवनीत प्रत्येक सोमवारी होणार पालकमंत्र्यांचा जनता दरबार’

188

आशाताई बच्छाव

1001925003.jpg

पवनीत प्रत्येक सोमवारी होणार पालकमंत्र्यांचा जनता दरबार’

नागरिकांनी आपल्या तक्रारी वेळेत सादर करण्याचे आवाहन

संजीव भांबोरे
भंडारा –पवनी तालुक्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी असून भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या निर्देशानुसार पवनी तहसील कार्यालयात आता प्रत्येक सोमवारला ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात येणार आहे. या दरबारात सर्वसामान्य नागरिकांना थेट आपल्या तक्रारी, निवेदने व अर्ज सादर करण्याची संधी मिळणार आहे.

८ सप्टेंबरला प्रथमच जनता दरबार दर सोमवारला जनता दरबार
२०२५ या उपक्रमाअंतर्गत येत्या ८ सप्टेंबर रोजी (सोमवार) सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत तहसील कार्यालय, पवनी येथे नागरिकांकडून तक्रारी व निवेदने स्वीकारली जाणार आहेत. विशेष म्हणजे, त्याच दिवशी दुपारी १ वाजता अर्जांवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणींचे त्वरित निवारण होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या जनता दरबारात नागरिकांनी लेखी स्वरूपात वेळेच्या आत आपल्या तक्रारी सादर कराव्यात असे आवाहन

तहसीलदार किरण भास्कर वागस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार तहसील कार्यालयातून अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात येईल. इच्छुक नागरिकांनी ठराविक नमुन्यात व निश्चित वेळेत तक्रार अथवा निवेदन प्रत्यक्ष हजर राहून सादर करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.या जनता दरबारला तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थीत राहणार आहेत. या जनता दरबारामुळे
पवनी तालुक्यातील जनतेला आपल्या प्रश्नांवर थेट पालकमंत्र्यांसमोर आपल्या समस्या अंड्याचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पवनी तालुक्यातील नागरिकांनी आपल्या समस्या जनता दरबारात ते की स्वरूपात सादर करून समस्येचे निराकरण करावे असे आवाहन तहसीलदार पवनी यांनी केलेले आहे.

Previous articleडॉ.प्रशांत डी चव्हाण यांना राज्यस्तरीय आरोग्य रत्न पुरस्कार प्रदान.
Next articleजनता विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.