आशाताई बच्छाव
अड्याळ येथे पोलीस व डॉक्टर बंधूंना सुरक्षाबंध
संजीव भांबोरे
भंडारा -पवनी तालुक्यातील अड्याळ येथे ग्रामीण रुग्णालय व पोलीस स्टेशन मध्ये समाज जागृती प्रतिष्ठान द्वारा संचालित स्व. हरिदासजी बदियानी स्मृती अभ्यासिका तर्फे सुरक्षाबंध ( रक्षाबंधन ) कार्यक्रम ०९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ०९:०० वाजता संपन्न झाला. पोलीस विभाग तथा वैद्यकीय विभागातील कर्मचारी हे सामाजिक बांधिलकी म्हणून अहोरात्र देशकार्यासाठी व समाजसेवेत झटणाऱ्यांना सुरक्षासुत्र कार्यक्रम संपन्न झाला. ग्रामीण रुग्णालय अड्याळ व पोलीस स्टेशन अड्याळ येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी देशांतर्गत कायदा, सुरक्षा व सुव्यवस्था सक्षम राखण्यासाठी अहोरात्र झटत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना समाजात शांतता व सुरक्षितताअनुभवता येते.
सतत कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलातील तसेच ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व महिला कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन करुन आपले नागरी कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न या रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने आपण करण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत , असे समितीच्या पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले.