Home बुलढाणा सिंदखेड राजा तालुक्यात ढग फुटला! ओढ्याला आला अचानक पुर; काठावर चरत असलेली...

सिंदखेड राजा तालुक्यात ढग फुटला! ओढ्याला आला अचानक पुर; काठावर चरत असलेली खिल्लार बैलजोडी वाहून गेली…

178

आशाताई बच्छाव

1001808872.jpg

सिंदखेड राजा तालुक्यात ढग फुटला! ओढ्याला आला अचानक पुर; काठावर चरत असलेली खिल्लार बैलजोडी वाहून गेली…
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा:– सिंदखेड राजा
तालुक्यातील हिवरखेड पूर्णा येथे
काल,६ऑगस्टच्या दुपारी अचानक ढगफुटी झाली. यावेळी ओढ्याला पूर आल्याने ओढ्याच्या काठावर चरत असलेली खिल्लार बैलजोडी वाहून गेली. काही वेळानंतर दोन्ही बैल मृत अवस्थेत सापडले. यात शेतकऱ्याचे सुमारे पावणे दोन लाखाचे नुकसान झा आहे.. शरद काशिनाथ नागरे यांची बैलजोडी हिवरखेड पूर्णा येथील ओढ्याच्या काठावर चरत होती. दुपारी ३ ते ४ वाजेच्या तुम्हालाच अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, अचानक ओढ्याला पूर आल्याने बैलजोडी वाहून गेली. दोन तीन तासांनी निमगाव वायाळ शिवारातील जिजेबा राजाराम गोरे यांच्या शेतात बैल मृतावस्थेत आढळले.
घटनास्थळी तहसीलदार, तलाठी यांनी पोहोचून पंचनामा केला. शेतकऱ्याला तातडीने मदत मिळावी अशी मागणी जनमाणसातून समोर येत आहे..

Previous articleगोठ्याला आग अन् अनर्थ…
Next articleश्रीक्षेत्र पाचोरे बु येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.