Home सामाजिक पत्रकार राजेंद्र उर्फ बाळासाहेब आहेर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व जो आवडे सर्वांना तोची...

पत्रकार राजेंद्र उर्फ बाळासाहेब आहेर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला

313

आशाताई बच्छाव

1001778401.jpg

पत्रकार राजेंद्र उर्फ बाळासाहेब आहेर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व

जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला

कै राजेंद्र नारायण आहेर उर्फ बाळासाहेब आहेर राहणार नारायणगाव (खेरवाडी) तालुका निफाड यांचा आज स्मृतिदिन अर्थात प्रथम पुण्यस्मरण*
आज बोलता बोलता पाहता त्यांना आपल्यातून परलोकी जाऊन एक वर्ष पूर्ण झाले .पत्रकार बाळासाहेब उर्फ राजाभाऊ आहेर यांचे शिक्षण व बालपण हे खेरवाडी गावातच गेले .लहानपणापासूनच चूळबुळीत ,चुनचुनित, आणि हुशार मुलगा, म्हणून शाळेत गावात प्रसिद्ध होता बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तशा पैकी राजेंद्र अशोक आणि एक लहान भाऊ ही तीन भावंडे ,बाळासाहेब म्हणजे मधला ,आई ,वडील भाऊ भावजया असे एकत्र कुटुंब, संसारामध्ये सुखी परिवारामध्ये बाळासाहेब राहत होते .शिक्षण झाल्यानंतर बाळासाहेबांचे लग्न शिंदे पळसे येथील ज्योती यांच्याशी झाले .त्याही हरिभक्त परायण कुटुंबातल्या त्यांना दोन अपत्य म्हणजे दोन मुली आहेत. मुली पण सुसंस्कृत आणि गायन वाद्य तसेच खूप चांगले संस्कार ज्योतीबाईंनी दिले. नावाप्रमाणे आहेर कुटुंबात दिव्याची ज्योत जशी कायम प्रकाशमान असते त्याप्रमाणे हा जीवनरुपी ज्योतीमय संसार त्यांनी फुलवला व बाळासाहेबांच्या पाठीशी ढाल म्हणून उभी राहिली. बाळासाहेबांना लहानपणापासूनच जबाबदारी म्हणून म्हणा किंवा आवड म्हणून म्हणा शेतीची आवड होती. आठ एकर जमीन कुटुंबाला आहे सदर जमीन करताना त्यांनी ऊन वारा पाऊस याची कसलीही परवा न करता सुंदर अशी माळरानावरील शेती फुलवली. ती बागायती बनवली सकाळी उठल्या उठल्या पाच वाजता शेतावर जाणारा गावातील पहिलाच माणूस .पहाटेच नांगर धरणारा बाळासाहेब सकाळची कामे उरकून तसेच जनावरांच्या धारा काढून घरी दूध घेऊन येणे आणि मग गावची सेवा आणि इतर पत्रकारिता अशी त्यांची दिनचर्या होती त्यांनी गावाचे विकासासाठी खूप कष्ट घेतले. विकासाच्या काळात त्यांनी प्रायमरी स्कूल ,ज्ञान विकास मंडळाचे हायस्कूल ,तसेच नीलांजनम ट्रस्ट ,या सामाजिक शैक्षणिक ट्रस्टवर खूप आवडीने आणि मेहनतीने काम केले.धार्मिक कार्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. प्रेमळ आणि निर्मळ स्वभाव त्यामुळे प्रत्येक माणसाच्या मनात घर करून बसलेला माणूस म्हणजे बाळासाहेब . आहेर बाळासाहेबांचे वकृत्व म्हणजे आजपर्यंत गावात असा माणूस झाला नाही लग्न असो दहाव्याचा कार्यक्रम असो शाळेचे शैक्षणिक कार्यक्रम असतो असो 15 ऑगस्ट 26 जानेवारी गणपती उत्सव नेत्यांचा सत्कार ,गावचा सप्ताह ,गावची यात्रा ,कोणताही उत्सव असो बाळासाहेब प्रथम हजर .मृदु गोड आणि वेळ आली तर कठोर अशा आवाजाचे व्यक्तिमत्व ,त्यांनी भाषण आणि निवेदक म्हणून सुंदर काम केले त्यांच्या आवाजामध्ये एक सुंदर लय होती .बोलताना कुठे आवाज मोठा कुठे नाजूक कुठे रडवेला अशी आवाजाची लय असलेला माणूस आज आपल्यात नाही .गावात कार्यक्रम असला आणि बाळासाहेब कधी गैरहजर असेल तर सर्व समाजाला पुट पुट लागायची आज बाळासाहेब दिसत नाही त्यामुळे कार्यक्रमाची मजाच जायची . बाळासाहेबांची वकृत्वावर खूप पकड होती समाजाशी जोडलेली नाळ आणि अंगचे उपजत गुण म्हणजे प्रेमळपणा सर्वांना सामावून घेणे सर्वांबरोबर एकोप्याने काम करणे या सर्व गोष्टींची दखल आमच्या गावचे माननीय सेवानिवृत्त डी वाय एस पी प्रकाश पाटील यांनी ओळखली होती म्हणून त्यांनी धार्मिक दृष्ट्या स्थापन केलेली नीलांजनम ट्रस्ट व त्याद्वारे त्यांचे धार्मिक कार्यक्रम प्रवचन ,धार्मिक किर्तन. वृक्षारोपण आरोग्य तपासणी शिबिर इत्यादी समाजासाठी समाजाला लागणाऱ्या गरजा व्यसनमुक्त समाज करण्याकरिता काय करता येईल यासाठी पाटील साहेबांनी बाळासाहेबांना आपल्या स्वतःच्या ट्रस्टवर संचालक म्हणून निवड करून घेतले कारण बाळासाहेबांच्या अंगी चांग ले गुण होते चांगल्या कामा साठी धार्मिक कार्यक्रमांसाठी कायम पुढाकार होता दर एकादशीला प्रवचन कीर्तन तसेच व्यसनमुक्ती बाबत चर्चा तंटामुक्ती बाबत चर्चा त्यांची व्यवस्था पाहणे गावचा शैक्षणिक आणि धार्मिक विकास कसा होईल याची तळमळ कायम असायची त्यांनी ती तळमळ निलांजनम ट्रस्टच्या माध्यमातून सगळ्या गोष्टींची सोडवणूक करण्यासाठी खूप प्रयत्न केले पाटील साहेबांच्या ट्रस्टवर काशीयात्रा असो अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी असो आदर्श सरपंच श्री पोपटराव पवार पाटोदा बीड यांचे आदर्श गाव असो अशा सर्व गावांना भेटी दिल्या. गावच्या तंटामुक्ती कार्यक्रमांमध्ये कायम पुढाकार घेऊन बाळासाहेबांनी बरेच वाद मिटविले. खेरवाडी गावात ज्ञान विकास मंडळाचे कै माणिकचंद रामनाथ शेठ मणियार यांचे नावे असलेले विद्यालय अर्थात हायस्कूल नावारूपाला आणण्यामागे त्यांचा खूप मोठा वाटा आहे शाळेसाठी देणगी मिळविणे म्हणजे बाळासाहेब सर्वांच्या पुढे असायचे .आज विद्यालयाला मुलांना पाण्यासाठी बाहेर जावे लागत नाही . त्यांनी ग्रामपंचायत, समाज, धर्मदाय व्यक्ती, यांच्या साह्याने बोर मारून पाण्याची व्यवस्था केली. शाळेला कलर करणे शाळेत वृक्षारोपण करणे मुलांची आरोग्य तपासणी करणे ग्रामसभा ,ग्रामपंचायत शाळेच्या सभा ,यांच्यासाठी त्यांचा सर्वात पुढाकार प्रथम असायचा .आज शाळेत कम्प्युटर रूम लायब्ररी पाण्याची टाकी शाळेला खाजगीरीत्या फर्निचर उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी गावच्या सामाजिक काम करणाऱ्या लोकांसमवेत काम करून स्मरणात राहील असे काम स्वतः उभे राहून केले .त्यांनी केलेले वृक्षारोपण म्हणजे निसर्ग बहरला आहे स्वतः झाडांना पाणी घालणारा बाळासाहेब आज आपल्यात नाही. पण कार्यरूपाने प्रेम रूपाने तसेच स्वतःच्या आवाजाने स्वतःच्या वक्तृत्वाने कर्तुत्वाने आपल्याबरोबर कायम आहे .पत्रकारिता असो पोलीस स्टेशन असो तहसीलदार कार्यालय असो अथवा माननीय आमदार साहेबांना भेटणे असो नेत्यांचा कार्यक्रम असो यासाठी गावातील सामाजिक कार्य करणारी मंडळी यांना बरोबर घेऊन बाळासाहेबांनी गावच्या विकासासाठी खूप धडपड केली 1979 साली स्थापन झालेली शैक्षणिक संस्था ज्ञानविकास मंडळ त्यांनी नंतरच्या काळात नावारूपास आणली चॅरिटी कमिशनर कडून सर्व परवानग्या पूर्तता करून आज कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही बाळासाहेबांनी एक विशेष म्हणजे आपल्या भारताचे राष्ट्रपती मिसाईल मॅन कैलास वाशी माननीय अब्दुल कलाम साहेब यांच्या गावी जाऊन त्यांची भेट घेतली असा हा अवलिया. हा तालुक्यातील प्रथम इसम. काही व्यक्ती जन्माला येतात त्या समाजाची सेवा करण्यासाठी येतात त्यांनी समाजाची बालकांची शाळेची धर्माची तसेच धर्म जागृत राहावा म्हणून धर्माची सेवा केली. वृक्षप्रेमी म्हणून झाडांची सेवा केली त्यांचे जाण्याने खेरवाडी गावचे अतोनात नुकसान झालेले आहे तसेच समाजाचे पण झालेले आहे गावी झालेत बहु होतील बहु परंतु या सवे नाही. ते पत्रकार असल्याने सर्व पत्रकार बांधवांशी त्यांचे खूप सलोख्याचे आणि प्रेमाची संबंध होते ज्येष्ठ पत्रकार तसेच वारकरी संप्रदायाची धुरा अंगावर घेऊन चालविणारे माननीय पत्रकार श्रीराम भाऊ आवारे यांचा बाळासाहेबांचा खूप स्नेह होता रामभाऊंचे नाव त्यांच्या मुखात कायम असायचे आणि रामभाऊ आवारे साहेबांना पण खेरवाडी ची खूप आवड होती आणि आहे आज बाळासाहेब आपल्यात नाहीत पण कार्यरूपाने ते आपल्यात कायम आहेत .आज त्यांना वर्ष श्रद्धा निमित्त त्यांच्या स्मृतीनिमित्त खेरवाडी गावचा समाज आणि परिसर त्यांचे मित्र मंडळ खेरवाडी गावचे ज्ञान विकास मंडळ, नीलांजनम ट्रस्ट, विविध कार्यकारी सोसायटी,, पाणी वाटप संस्था ,ग्रामपंचायत आणि सर्व संस्थांचे सुविध्य संचालक .निफाड तालुक्यातील आणि जिल्ह्यातील पत्रकार संघ व बांधव .तंटामुक्ती समिती व त्यावरील संचालक, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांतर्फे कैलासवासी राजेंद्र नारायणराव आहेर यांना विनम्र आदरांजली वाहतो त्यांचे ज्ञानरूपी तसेच धार्मिक कार्य खेरवाडी गावच्या कायम स्मरणात राहील हीच बाळासाहेबांना श्रध्दांजली…

शब्दांकन — बबनराव तात्या लांडगे (खेरवाडी)

Previous articleशेवरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी – तातडीने उपचारासाठी मालेगाव येथे हलवले
Next articleपाच जणांनी घेरून भोसकले सनीला ! तीन दिवसांपासून मागावर होते…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.